सोनगीरमध्ये 'तनिष्कां'नी साजरी केली राखी पौर्णिमा

एल. बी. चौधरी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

सोनगीर : येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील पाचवी ते दहावीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना राख्या बांधून व शैक्षणिक साहित्य वाटप करुन घालून येथील तनिष्का गटाने रक्षाबंधन साजरा केला. 

सोनगीर : येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी आश्रमशाळेतील पाचवी ते दहावीच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना राख्या बांधून व शैक्षणिक साहित्य वाटप करुन घालून येथील तनिष्का गटाने रक्षाबंधन साजरा केला. 

येथे अनुसूचित जाती व नवबौद्धमधील गरीब पण फक्त विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा आहे.  विद्यार्थ्यांना मोफत जेवण व निवासाची सोय आहे. गावापासून लांब आलेले हे गरीब विद्यार्थी रक्षाबंधनासाठी आपापल्या गावात जावू शकत नाही. त्यांना त्यांच्या बहिणीची माया मिळावी म्हणून येथील तनिष्का गटाने त्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा केला. त्यांना मिठाई वाटप केले. सर्व विद्यार्थ्यांना वही पशैक्षणिक यावेळी गटप्रमुख तथा पंचायत समिती सदस्या रुपाली माळी म्हणाल्या की छात्रालयातील मुलांबरोबर रक्षाबंधन साजरा करतांना अत्यंत आनंद झाला. घरदार, आईवडील सोडून येथे ही मुले राहतात. त्यांना मायेची गरज आहे. विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन शैक्षणिक प्रगती साधावी.

समन्वयक शकुंतला चौधरी म्हणाल्या की रक्षाबंधनाचे पर्व साधून विद्यार्थ्यांनी आपल्याच नव्हे तर इतर सर्व बहिणींचे रक्षण करण्याची, त्यांना अडचणीत मदत करण्याची शपथ घेतली पाहिजे. 

यावेळी तनिष्का गट प्रमुख रुपाली माळी, सदस्या शकुंतला चौधरी, प्रतिभा लोहार, सुलभा ईशी आदी उपस्थित होत्या. याशिवाय कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाचे संचालक संदीप कासार, प्रा. डी. एच. धनगर उपस्थित होते.

Web Title: marathi news marathi website Dhule Raksha Bandhan