मराठी संगीत टिकवायचे असेल तर अभिजित हवे : कौशल इनामदार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मोहाडी : माझी ओळख माझ्या गाण्यात आहे, ते मुंबई केंद्रावर लावणार नाही कारण ते मराठी आहेत म्हणून तुम्ही भाषेला डाउन मार्केट म्हणतात. आज मराठी संगीत भाषेला कुंपण राहिलेले नाही. गाणे जिवंत राहिले नाही तर गायकच राहणार नाही. लहान मुलांसाठी उत्तम गाणे दिले पाहिजे, मराठी संगीत टिकवायचे असेल तर अभिजित पाहिजे, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध गायक कौशल इनामदार यांनी व्यक्त केले. 

कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन आयोजित श्रीकृष्ण व्याख्यानमालेचे चौथे पुष्प "मराठी संगीताची वाटचाल' या विषयावर गुंफताना ते बोलत होते. दिंडोरी तहसीलदार बाबासाहेब गाढवे अध्यक्षस्थानी होते. श्री. इनामदार म्हणाले, की जुनी गाणी हल्ली हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत, ही मराठी गाण्याची शोकांतिका आहे. जुनी मराठी गाणी गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. जगात साडेसहा हजार भाषांपैकी मराठी भाषेचा 55 वा क्रमांक लागतो. आज मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

मुलांनी इंग्रजी शाळेत जरूर शिकावे पण मराठी भाषेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात ऐंशी टक्के हिंदी गाणी लावली जातात. पण मराठीची फक्त वीस टक्के लावली जातात. या वेळी त्यांनी श्रीनिवास खळे, सुधीर फडके, रानडे, जी. एन. जोशी आदी गायकांच्या गाण्यांचा आपल्या गायनात उल्लेख केला. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी उदय किसवे, दिंडोरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर गावित, प्रवीण जाधव, विलास पाटील होते. श्री. किसवे यांनी व्याख्यानमाला उपक्रमाचे कौतुक करून उपक्रम आदर्शवत आहे, असे सांगितले. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरपंच सुरेश गावित, उपसरपंच रवींद्र जाधव यांच्यासह ग्रामस्थ, महिला, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य विलास देशमुख यांनी प्रास्ताविक केले. धनंजय वानले यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय डिंगोरे यांनी आभार मानले. 

आज (ता. 6)चा विषय 
स्वामिनाथन आयोग 

  • व्याख्याते : ललित बहाळे 
  • वेळ : सायं. 6 
Web Title: marathi news marathi website Nashik News Kaushal Inamdar