भामेर ग्रामपंचायतीवर महिलाराज : उपसरपंचपदी निलाबाई थोरात बिनविरोध

प्रा. भगवान जगदाळे
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) येथील तेरा सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच निलाबाई गोकुळ थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याने भामेर ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. लोकनियुक्त सरपंच वैशाली मनोज सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला.

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील भामेर (ता.साक्री) येथील तेरा सदस्यीय ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकतीच निलाबाई गोकुळ थोरात यांची बिनविरोध निवड झाल्याने भामेर ग्रामपंचायतीवर महिलाराज आले आहे. लोकनियुक्त सरपंच वैशाली मनोज सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला.

सकाळी दहाला ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच निवडीसाठी सरपंच वैशाली सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सकाळी दहा ते बारादरम्यान नामांकनपत्रे दाखल करणे, बारा ते एक दरम्यान माघार घेणे, त्यांनतर छाननी व निकाल घोषित करणे अशी मुदत दिली होती. त्यात ग्रामपंचायत सदस्य निलाबाई गोकुळ थोरात यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने सरपंच श्रीमती सोनवणे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. ग्रामपंचायत सदस्य सुभाष भिल सूचक होते, तर तुळशीराम कोरडकर अनुमोदक होते. निलाबाई थोरात यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ग्रामसेवक जितेंद्र बोरसे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रत्नाबाई वाघ, तुळशीराम कोरडकर, जबनाबाई भिल, सिंधुबाई सोनवणे, भीमराव बर्डे, लक्ष्मीबाई जाधव, सुभाष भिल, मनीषा सोनवणे, शिवा कारंडे, पांडुरंग सोनवणे, नाना थोरात आदी उपस्थित होते.

बिनविरोध उपसरपंच निवडीसाठी ग्रामविकास पॅनलप्रमुख जीभाऊ वाघ, गटनेते व माजी सरपंच मनोज सोनवणे, डॉ. भरत वाघ, प्रकाश सोनवणे, देविदास सोनवणे, वसंत वाघ, दाजभाऊ पगारे, नाना बोरकर, धनराज थोरात, रामा सोनवणे, अरुण सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. "उपरपंच निलाबाई थोरात यांचा उपसरपंचपदाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असून त्यांनतरची दोन वर्षे ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम कोरडकर यांना, तर शेवटचे एक वर्ष ग्रामपंचायत सदस्या रत्नाबाई वाघ यांना उपसरपंचपदाची संधी दिली जाणार आहे," अशी माहिती गटनेते तथा माजी सरपंच मनोज सोनवणे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Web Title: marathi news marathi websites Dhule News Bhamer Grampanchayat