चाळीसगाव : नववीतील मुलाची पिलखोडला आत्महत्या

शिवनंदन बाविस्कर
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

पिलखोड (ता.चाळीसगाव) : येथील रहिवासी तथा नववीत शिकणाऱ्या मुलाने काल (ता. 28) दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला.

येथील विनोद परमेश्वर सोनवणे(वय 14) या नववीत शिकणाऱ्या मुलाने काल (ता. 29) दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. विनोदची आई सकाळी नाशिकला गेली होती. तर बहीण दुसऱ्याकडे शेतात कामाला गेली होती. त्यामुळे तो घरी एकटाच होता. तेव्हाच त्याने आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.

त्याची बहीण सायंकाळी घरी परतल्यावर हा प्रकार तिच्या लक्षात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

विनोदची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्याला तीन बहिणी असून एक बहिण विवाहित आहे. तर त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. विनोद शाळेत अत्यंत हुशार होता. तसेच मित्रांचा लाडका होता. शिवाय त्याला डान्सची विशेष आवड होती. तो उत्कृष्ट नृत्य करायचा. यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीला त्याने स्त्री वेष परिधान करून ग्रुप नृत्य सादर केले होते. त्याच्या नृत्याला उपस्थितांनी कौतुक करत दाद दिली होती. असे त्याच्या मित्रांनी सांगितले.

दरम्यान त्याच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: marathi news marathi websites Dhule News Chalisgaon Suicide