नाशिकमधील इंदिरानगर परिसरात स्फोटके सापडली 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

नाशिक : इंदिरानगर परिसरातील पाथर्डी गाव- मुंढेगाव रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसांच्या गस्ती पथकाला जिलेटिन व डिटोनेटरने भरलेली बॅग सापडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे रात्रीचे गस्तीपथक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी रात्री दीड वाजेच्या सुमारास पाथर्डी गाव-मुंढेगाव रस्त्यावर बेवारसरित्या बॅग सापडली.

सदरील बॅगची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यामध्ये 60 जिलेटिनच्या कांड्या व 17 डिटोनेटर आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला असून प्रथम दर्शनी परिसरात विहीर खोदण्याचे काम सुरू असण्याची शक्‍यता असून त्यासाठी सदरची स्फोटके असावीत, असा पोलीसांचा कयास आहे.

Web Title: marathi news marathi websites Nashik News Crime News