''शेतीला पूरक उद्योगांची जोड दिल्यास उत्‍पन्‍नात निश्चितच वाढ होते''

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

सटाणा : राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा बदल घडून येत असला तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला इतर शेतीपूरक उद्योगांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नात निश्चितच वाढ होते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभाग केंद्रप्रमुख डॉ.रावसाहेब पाटील यांनी आज केले.

सटाणा : राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा बदल घडून येत असला तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला इतर शेतीपूरक उद्योगांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्‍या उत्‍पन्‍नात निश्चितच वाढ होते, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विभाग केंद्रप्रमुख डॉ.रावसाहेब पाटील यांनी आज केले.

'गिरणा गौरव प्रतिष्ठान'च्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त वीरगाव (ता.बागलाण) येथील प्रगतीशील शेतकरी रामभाऊ ठाकरे यांच्या शेतावर आयोजित 'द्राक्ष परिसंवाद' व 'ग्रेप्स आयकॉन २०१७ सन्मान पुरस्कार' सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे माजी प्रांतिक अध्यक्ष रामचंद्र बापू पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, दै. एग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश उगले, पत्रकार सचिन वाघ, रामदास बस्ते, जगदीश कुलकर्णी, बापू पाटील, कृष्ण रौंदळ, अरुण सोनवणे आदी उपस्थित होते.

डॉ.पाटील म्हणाले, ''शेतकऱ्यांनी विविध नवीन तंत्रज्ञान अवगत केले असले तरी संपूर्ण शेती हि निसर्गावरच अवलंबून असते. शेतीचे व्यवस्थापन व शेतमाल विक्री अशा विविध अडचणीना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत असल्याने अनेक नैसर्गिक संकटाचाही तेवढ्याच प्रमाणात सामना करावा लागतो त्यासाठी शेतीबरोबरच शेतीला पूरक व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे.''

प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर शेती परिसंवाद घेणे ही उल्लेखनीय बाब असून अशा परिसंवादांना राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून घोषित करण्यात यावे. त्यातून शेतकर्यांना प्रेरणा मिळत राहील असे मत दै.एग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश उगले यांनी मांडले.

सचिन वाघ यांनी शेतकऱ्याने स्वताचा ब्रांड निर्माण करण्याची गरज असून ब्रांड निर्माण करणारा शेतकरीच जागतिक बाजारपेठेत स्व:ताचे स्थान निर्माण करू शकेल असे सांगितले. रामचंद्र बापू पाटील यांनी शेतकरी सुजलाम सुफलाम बनला असून प्रगतीकडे वाटचाल करीत असला तरी शेतकर्याने विक्री व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'ग्रेप्स आयकॉन २०१७ सन्मान पुरस्कार' वितरण करण्यात आले.

कार्यक्रमास राज्य डाळिंब महासंघाचे संचालक केशव मांडवडे, के.के.शिंदे, सुनील बोरसे, कृष्ण बच्छाव, विश्वास मोरे, राजेंद्र निकम, केदा महिरे, बाळासाहेब वाघ, किरण वाघ, दीपक पगार, धनराज निकम, विजय ठाकरे, रवींद्र ठाकरे, भास्कर ठाकरे, भाऊसाहेब ठाकरे, आबा जाधव, भारत सोनवणे, सुनील देवरे, पप्पू मोरे, एस.टी.देवरे, विशाल कापडणीस आदींसह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. भूषण निकम यांनी प्रास्ताविक केले. बागलाण विकास मंचचे समन्वयक नंदकिशोर शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन ठाकरे यांनी आभार मानले.

'ग्रेप्स आयकॉन २०१७ सन्मान पुरस्कार' प्राप्त द्राक्ष उत्पादक शेतकरी

केदा काकुळते, दिलीप बोरसे, केदा भामरे, अनिल निकम, रामदास पाटील, धनंजय जाधव, शंकर मांडवडे, राजेंद्र जाधव, कृशिभूष्ण खंडू शेवाळे, नानाभाऊ ठाकरे, बापू खैरनार, कृष्णा भामरे.

Web Title: marathi news marathi websites Nashik News Nashik Grapes YCMOU