'आई अंबे की जय..'च्या जयघोषात दुमदुमला सप्तश्रृंगी गड

दिगंबर पाटोळे
सोमवार, 25 डिसेंबर 2017

वणी (नाशिक) :  धनुर्मासातील सकाळी सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडताच 'आई अंबे की जय, सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषाने अवघा सप्तश्रृंगी गड निनादून गेला. आज धनुर्मास उत्सवातील दुसरा रविवारचा योग साधीत भगवतीच्या चरणी लाखावर भाविक नतमस्तक झाले.

देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचा धनुर्मास उत्सव सुरु आहे. श्रावन महिन्याप्रमाणेच धनुर्मासास विशेष धार्मिक महत्त्व असल्याने या महिन्यात गडावर भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. 

सूर्यदेवतेचा उत्सव असलेल्या व रविवार हा सूर्यनारायणाचा वार समजला जात असल्याने आज आई भगवतीच्या मूर्तीवर पडणारे सूर्याचे किरणांचे दृश्य 'याची देही, याची डोळा' बघून देवीचरणी नतमस्तक होण्यासाठी आज पहाटे कडाक्याच्या थंडीतही हजारो भाविक गडावर दाखल झाले होते.

देवीची पंचामृत महापुजा सूर्योदयापूर्वी सकाळी पाचवाजेपासून सुरु करण्यात आली. पूजा संपन्न झाल्यानंतर सूर्यांचे किरण देवीच्या मूर्तीवर येताच देवीची आरती संपन्न झाली. आरतीनंतर आदीमायेस मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाच्या पदार्थाचा महानैवदय दाखविण्यात आला.

दरम्यान शाळांना लागलेली नाताळाची सुट्टी, शासकीय कार्यालयांना असलेल्या सलग तीन दिवसांची सुट्टीची पर्वणी साधत आज सकाळ पासून भाविकांच्या दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान बाऱ्या राम मंदीर टप्प्यापर्यंत आल्या होत्या. भाविकांच्या गर्दी मुळे गडावर यात्रोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते. भाविकांच्या खाजगी वाहने गडावर मोठ्या संख्येने दाखल झाल्यामुळे ग्रामपंचायत टोल नाक्यापासून शिवालया पर्यंत रस्त्याच्या दुर्तफा वाहानांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गडावरील वाहतूकीची कोंडी निर्माण होत होती. दरम्यान गडावर राज्य परीवहन महामंडळाच्या नियमित बसेसच धावत असल्यामुळे बसेसला मोठी गर्दी होती. ठराविकच बसेस असल्यामुळेे भाविकांना नाईलाजास्तव खाजगी प्रवाशी वाहनातून प्रवास करावा लागत होता. सध्या नातळाच्या सुट्टया, शैक्षणिक सहलीमुळे गडावर भाविकांचा वाढता राबता अून राज्य परिवहन महामंडळाने नाशिक, नांदुरी, कळवण येथून जादा बसेस सोडण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

रवि धनु राशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या कालखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रवणासारखाच पवित्र मानला जातो या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व अन्हिकं उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात.

Web Title: marathi news marathi websites nashik news saptashrungi devi