मार्च एंड वसूलीमुळे संगणकीकरण पून्हा ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नाशिक : गेल्या वर्षी 15 ऑगस्टला उद्घाटन झालेल्या ऑनलाईन सातबारा देण्याच्या उपक्रम आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची सुताराम शक्‍यता नाही. ÷उद्घाटनापासून संथ सुरु असलेल्या संगणकीकरणाचे कामकाज मार्च एंडच्या महसूल वसूलीमुळे पून्हा ठप्प पडले आहे. 

नाशिक : गेल्या वर्षी 15 ऑगस्टला उद्घाटन झालेल्या ऑनलाईन सातबारा देण्याच्या उपक्रम आर्थिक वर्षात पूर्ण होण्याची सुताराम शक्‍यता नाही. ÷उद्घाटनापासून संथ सुरु असलेल्या संगणकीकरणाचे कामकाज मार्च एंडच्या महसूल वसूलीमुळे पून्हा ठप्प पडले आहे. 

जिल्ह्यातील 5 तालुक्‍यांचे पूर्णः तर 2 तालुक्‍याचे अंशत असा सातच तालुक्‍याचे कामकाज पूर्ण झाले आहे. जिल्हयातील 1966 गावांपैकी 1674 गावातील 73 टक्के कामे पूर्ण झाली असून आहे. जिल्ह्यातील नाशिक, मालेगाव, इगतपुरी, निफाड हे चार तालुके मात्र पिछाडीवर आहे. अशातच सध्या मार्च एंडच्या महसूल वसूलीचे उदिष्ट्य गाठण्यासाठी दमछाक उडालेल्या यंत्रणेकडून जिल्हयात ऑनलाईन सातबारा आणि संगणकीकरणाचे काम पून्हा ठप्प पडले आहे. 

भूमिअभिलेखांच्या संगणकीकरणाची योजना देशभरात राबविली आहे. केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने यासाठी 100 टक्के अनुदान दिले आहे. सातबारा नोंदीमधील बेकायदेशीर फेरफार, गरप्रकार आणि मानवी चुका रोखण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र हस्तलिखित सातबारांची संगणकीय नोंदणी होण्यास उशीर झाल्याने हे काम बरेच दिवस रखडले होते.

ऑनलाईन मुळे कुणालाही घरबसल्या सातबारे ऑनलाइन पाहता येतील, त्याची प्रिटंही काढता येईल, अशा सुविधेमुळे प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व गतिमानता येउन उताऱ्यावरील बेकायदेशीर नोंदी आणि फेरफार यांना आळा बसणार आहे. 

 जिल्हयात 15 ऑगस्टपासून पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन सातबारा वाटपाचा शुभारंभही प्रायोगिक तत्वावर झाला. पण अनेक तालुक्‍यांचे कामे अपूर्ण असल्याने हे ऑनलाईन सातबारा उपलब्ध होउ शकला नाही. जिल्हयातील कळवण, त्रयंबक, देवळा, पेठ, सुरगाणा सातबारा संगणकिरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.दिंडोरी 97, चांदवड 96, बागलाण 80, येवला 74 टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व्हरच्या अडचणीमुळे या कामात विलंब होत होता. अशा ठिकाणी ऑफलाईन काम सुरू आहे. 
पण आता मार्च एण्ड वसुलीमुळे यंत्रणा व्यस्त असल्याने हे काम पून्हा पूर्णपणे ठप्प आहे. 

4 तालुके पिछाडीवर 
जिल्ह्यात चार तालुक्‍यांत संगणकिरणाचे काम असमाधानकारक आहे. निफाड 38.52, इगतपुरी 35.71, नाशिक 24.76, मालेगाव 16 टक्के काम पूर्ण झाले आहे. 
 

Web Title: marathi news march end vasuli