तोतया नवरदेवाची बोहल्याऐवजी तुरुंगात रवानगी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

सटाणा : लग्नाचे वय उलटूनही लग्न होत नसल्याने वैफल्यग्रस्त अवस्थेतील एका युवकाने आपल्या नात्यातीलच युवतीला थेट भावी वधू बनवून नातेवाईक व मित्रपरिवाराला लग्नपत्रिकेद्वारे विवाहाचे निमंत्रण दिले.संबंधित युवतीच्या कुटुंबीयांनी सटाणा पोलीस ठाण्यात 'त्या' युवकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि सटाणा पोलिसांनी या तोतया नवरदेवाला अटक केल्याने बोहल्याऐवजी त्याची रवानगी आता तुरुंगात झाली आहे.

 प्रवीण दादाजी मोरे (रा.मेशी ता.देवळा)......या युवकाने बागलाण तालुक्यातील त्याच्याच नात्यातील एका युवतीशी येत्या शुक्रवारी( ता. 18) ब्राम्हणगाव (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत दुपारी साडेबाराला विवाह होणार असल्याच्या निमंत्रण पत्रिका छापल्या होत्या. या लग्नपत्रिका त्याने नातेवाईक व काही मित्रपरिवाराला वाटल्या. मात्र लग्नपत्रिकेत सविस्तर उल्लेख असलेल्या वधूच्या कुटुंबियांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता सटाणा पोलीस ठाणे गाठले.

लग्नाची कोणतीही बोलणी झालेली नसतांना व आम्हाला याबाबत कोणतीही कल्पना नसतांना लग्नपत्रिकेत परस्पर माझ्या नावाचा उल्लेख वधू म्हणून करत माझी बदनामी केल्याची तक्रार पिडीत मुलीने सटाणा पोलीस ठाण्यात दाखल केली. तिने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत कोणत्याही नातेवाईकाला विचारात न घेता संपूर्ण कुटुंबाची बदनामी झाली असून काहीएक संबंध नसतांना माझ्या नावाचा वधू म्हणून वापर करून लग्नपत्रिका वाटल्याने तोतया नवरदेव प्रवीण दादाजी मोरे, सुनिता दादाजी मोरे, व त्यांना सहकार्य करणारा दिलीप देवराम शिरसाठ यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.

लग्न जमलेले नसतांनाही प्रवीण मोरे याने छापलेली लग्नपत्रिका अचंबित करणारी आहे. या लग्नपत्रिकेत पुण्यस्मरण, नमन, प्रेषक, संयोजक, कार्यवाहक, व्यवस्थापक, सहकार्य, निमंत्रक अशा विविध मथळ्याखाली त्याच्या नातेवाईकांची देखील नावे टाकली असून “आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हं...” म्हणून कुटुंबातील लहान मुलांचीही नावे टाकली आहेत. 
 
Web Title: marathi news marriage