अन्याय,अत्याचारविरोधात मातंग समाजाचा धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक ः मनुवादी भुमिका घेणाऱ्या संभाजी भिडे यांच्या संघटनेसह सनातनवर बंदी घालावी, मातंग समाजावरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी, साठे महामंडळास हजार कोटींचे भागभांडवल पुरविणे, समाजाच्या संपादित केलेल्या जमिनी परत करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी आज मातंग समाज क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

गोल्फ क्‍लब मैदानापासून सुरू झालेल्या मोर्चाची शिवाजी रोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ समाप्ती झाली. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजाभाऊ वैरागर, संतोष अहिरे, सचिन नेटारे, अशोक साठे, यु.के. अहिरे आदींतर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: marathi news matang samaj agtation