महापौर पदासाठी 11 तर उपमहापौर पदासाठी 10 अर्ज 

live
live

नाशिक- भाजपच्या अंतर्गत कुरबुरींमुळे चर्चेच्या ठरतं असलेल्या नाशिक महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत इच्छुकांच्या भाऊ गर्दीमुळे रंगतं आहे. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौर पदासाठी अकरा तर उपमहापौर पदासाठी दहा इच्छुकांनी अर्ज दाखल केले. महापौर पदासाठी भाजपच्या पाच तर शिवसेनेच्या चौघांनी अर्ज दाखल केले. कॉंग्रेस व सानप समर्थकांनी देखील प्रत्येकी एक अर्ज महापौर पदासाठी दाखल केला. 

येत्या शुक्रवारी (ता. 22) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक होत आहे. 
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. भाजप मध्ये महापौर पदावर एकमत न झाल्याने पाच अर्ज दाखल झाले. त्यात दिनकर आढाव, शशिकांत जाधव, सतीश कुलकर्णी, भिकुबाई बागुल, गणेश गिते यांनी अर्ज दाखल केले. तर उपमहापौर पदासाठी गणेश गिते, अलका आहेर, अरुण पवार, भिकुबाई बागुल यांनी अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार ऍड. राहुल ढिकले, सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतीने अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर व विलास शिंदे यांनी महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी विलास शिंदे यांचा एकमेव अर्ज आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष शरद आहेर यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राहुल दिवे यांचा महापौरपदासाठी तर शाहु खैरे, डॉ. हेमलता पाटील यांनी उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुफी जीन यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. 

गितेंना उपमहापौर उमेदवारीची लॉटरी 
महापौर पदासाठी एका नावावर एकमतं होत नसल्याने दिनकर आढाव, शशिकांत जाधव, सतीश कुलकर्णी यांना अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्या असून सभागृहात माघार घेतली जाणार आहे. भिकुबाई बागुल यांचा अर्ज ऐनवेळी दाखल करण्यात आला. गणेश गिते यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केला असला तरी उपमहापौर पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज भाजपकडून ठेवला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

गुप्त बैठकांना वेग 
दिनकर पाटील यांना उमेदवारी नाकारून सातपूर मधून शशिकांत जाधव यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्याने पाटील समर्थक नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली आहे. जाधव यांचे नाव पुढे करताना पक्षाची प्रतिमा व त्यांचे विविध संघटनांवर असलेले प्राबल्य लक्षात घेवून उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी पाटील यांना वरिष्ठांनी शब्द देवूनही तो न पाळल्याने नाराजी निर्माण झाली. पुढील भुमिका ठरविण्यासाठी आज दिवसभर बैठका सुरु होत्या विशेष म्हणजे आमदार सिमा हिरे यांची पसंती देखील पाटील यांच्या नावाला असताना देखील जाधव यांचे नाव पुढे आल्याने नाराजी पसरली आहे. सतीश कुलकर्णी यांच्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले. पक्षाशी अनेक वर्षांपासुनची निष्ठा हा मुद्दा कुलकर्णी यांच्या बाबतीत पुढे करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com