महापौर निवडणुकीपुर्वीचं भाजप मध्ये फुट, सानप समर्थक बोडके, पिंगळेंचा अर्ज 

live
live

नाशिक- महापालिकेच्या सोळाव्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेने सोबत भाजपचे दहा नगरसेवक असल्याची आतापर्यंत फक्त चर्चा होती मात्र कमलेश बोडके व सुनिता पिंगळे यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करताना सुचक व अनुमोदक म्हणून सानप समर्थक नगरसेवकांच्या स्वाक्षरी घेतल्याने भाजप मध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

 एकीकडे सत्तेसाठी दावा करणाऱ्या भाजप समोरील अडचणी वाढल्या असून मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भुमिकेवर भाजपच्या सत्तेचे गणित अवलंबून राहणार असल्याचे स्पष्ट झाले तर शिवसेनेने बहुमत नसताना महापौर पदाच्या शर्यतीत उडी घेतल्याने भाजपच्या सत्ता स्थापनेत अडसर निर्माण केला आहे. 
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्याचे परिणाम महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत दिसून येत आहे. शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेल्या सानप यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेला चांगलाचं बुस्टर डोस दिला आहे.

सानप यांच्यासोबत भाजपचे दहा नगरसेवक गेल्याने भाजपच्या पायाखालची वाळु घसरल्याने तातडीने नगरसेवक सहलीला रवाना करण्यात आले. आतापर्यंत भाजपचे दहा नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची फक्त चर्चा होती मात्र आज राजकीय परिस्थितीचे वास्तव समोर आले ते ज्यांच्या नावाची चर्चा होती त्यांनीचं महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर. सानप समर्थक कमलेश बोडके व सुनिता पिंगळे या दोघांनी आज संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी,

  जिल्हाप्रमुख विजय करंजकर व माजी आमदार बाळासाहेब सानप तसेच शिवसैनिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप मध्ये फुट पडल्याचे स्पष्ट झाले. कमलेश बोडके यांनी महापौर व उपमहापौर तर सौ. पिंगळे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. बोडके यांना मच्छिंद्र सानप, प्रियंका माने अनुक्रमे सूचक, अनुमोदक तर उपमहापौरपदासाठीच्या अर्जात पुनम धनगर, विशाल संगमनेरे हे सूचक, अनुमोदक आहेत. पिंगळे यांना सीमा ताजणे व अनिता सातभाई सूचक, अनुमोदक आहेत. 

पक्षश्रेष्ठींना देणार माहिती

भाजपतर्फे महापौर, उपमहापौर पदासाठी वरिष्ठांकडून ज्यांच्या नावाची सुचना आली त्यांनाचं अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले.पण कमलेश बोडके, सुनिता पिंगळे यांची पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींना अहवाल देवू.- जगदीश पाटील, गटनेते भाजप. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com