अंमली पदार्थ विक्री रॅकेटमधील आणखी दोघांना अटक,कोट्यवधीचा ऐवज जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

अंमली पदार्थ विक्री रॅकेटमधील आणखी दोघांना अटक; 

नाशिक : अंमली पदार्थ विक्री रॅकेटच्या तपासातील आणखी एक कडी उघडण्यात नाशिक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी मुंबई येथून दोघा जणांना अटक करत त्यांच्याकडून 2200 ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि जॅग्वॉर कारसह एक कोटी 24 लाख रूपयांचा ऐवजही जप्त केला आहे.

याप्रकरणी दोन ते तीन दिवसांपूर्वी अटक केलेल्या संशयित गावठी कट्टा विक्री प्रकरणातही सहभागी असून पोलिसांनी त्यांच्याकडून सात गावठी कट्टे आणि 25 जिवंत काडतुसेही जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. 

16 मे रोजी इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा जणांना अटक करत त्यांच्याकडून 265 ग्रॅम अंमलपदार्थांसह टाटा सफारी कार असा 15 लाख 76 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. 
या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी गुन्हे शाखेच्या पथकास दिले असता नाशिक पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या दृष्टीने संशयितांकडे सखोल चौकशी केली असता  अंमलीपदार्थ मुंबई येथून आणले असल्याची माहिती मिळाली.पोलिसांच्या दोन पथकाने मुंबईमधून मिळालेल्या माहितीवरून लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स येथे दोघे संशयित अंमलीपदार्थ विक्रीच्या हेतूने संशयित नदीम सलीम सौरठिया (वय 30, नागपाडा, मुंबई), सफैउल्ला फारूख शेख (वय 23, मिरारोड) या दोघांनाही सापळा रचून अटक केली.

पोलिसांनी यांच्याकडून 44 लाख रूपये किंमतीचे 2200 ग्रॅम एम.डी. ड्रॅग्ज आणि 80 लाख रूपये किंमतीच महागडी जॅगवॉर कार असा 1 कोटी 44 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
सदरच्या कारवाईत पोलिस निरीक्षक आंनदा वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दिपक गिरमे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पळशीकर, पोपट कारवाळ, जाकीर शेख, रवींद्र बागुल, अनिल दिघोळे, बाळासाहेब दोंदे, संजय मुळख, वसंत पांडव, श्री. सूर्यवंशी आदींचा सहभाग आहे. 

   अंमलीपदार्थमधील संशयितचा कट्टा विक्रीतही सहभाग 
इंदिरानगर येथून अंमलीपदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिसांनी अटक केलेल्या रणजित गोविंदराव मोरे (वय 32,पाथर्डी फाटा, नाशिक) यास अटक केली होती. संशयितचा हा गावठी कट्टा विक्रीतही सहभाग असल्याने त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांने नाशिकमधील तिघा जणांना गावठी कट्टा विक्री केल्याची माहिती दिली असता पोलिसांनी संशयित निगेहबान इम्तीयाज खान (ओंकार रेसिडन्सी, टिटवाळा), दिपक राजेंद्र जाधव (पंचवटी, नाशिक) आणि अमोल भास्कर पाटील (म्हसरूळ टेक, शिवाजी चौक, नाशिक) यांना ताब्यात घेत त्यांना विक्री केलेले 7 गावठी पिस्तुल आणि 25 जिवंत काडतुसे असा सुमारे 2 लाख 12 हजार 500 रूपयांचा मुद्देमालही जप्त केला आहे. 

अंमलीपदार्थ विक्री रॅकेटची आणखी एक कडी उघडण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. आणखी या प्रकरणचा सखोल तपास सुरू असून यामध्ये आणखी कोण आहे.? हे अंमलीपदार्थ कुठूण आणले? याचा तपास केला जात आहे. जिथे-जिथे लिंक मिळेल त्याचा सगळा तपास केला जाणार आहे. यामध्ये बरेच महत्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळालेली आहे. 
डॉ. रवींद्रकुमार सिंगल (पोलिस आयुक्त, नाशिक) 
 
Web Title: marathi news md drugs