पालिकेच्या डॉक्‍टरांची खासगी प्रॅक्‍टीस बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांकडून खासगी रुग्णालये, दवाखाने चालविले जात असल्याच्या अनेक वर्षांपासूनच्या नगरसेवकांच्या आरोपांवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रामबाण ईलाज योजला आहे. खासगी प्रॅक्‍टीस करताना आढळल्यास थेट गुन्हेचं दाखल करण्याची धमकी दिल्याने डॉक्‍टरांचे धाबे दणाणले आहेत. 

शहरात महापालिकेचे बिटको, डॉ. जाकीर हुसेन, मोरवाडी, इंदिरा गांधी व मायको हे मोठे रुग्णालये आहेत. त्याशिवाय तीस शहरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून रुग्ण सेवा दिली जाते. यासाठी पालिकेच्या आस्थापनेवर डॉक्‍टर देखील नियुक्त करण्यात आले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देताना चोविस तास कार्यरत असले पाहिजे असा नियम आहे. त्यासाठी डॉक्‍टरांना पालिकेमार्फत चांगले वेतन देखील दिले जाते. पालिकेचे वेतन घेण्याबरोबरचं परंतू डॉक्‍टरांकडून खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देवून मोठी आर्थिक कमाई केली जाते. याव्यतिरिक्त पालिकेच्या रुग्णालयातील रुग्ण पळविणे, खासगी मेडीकल मधून औषधे घेण्यास भाग पाडणे आदी प्रकार होत असल्याचा आरोप नगरसेवकांकडून वांरवार केला जातो. पालिकेच्या काही डॉक्‍टरांची खासगी क्‍लिनिक व रुग्णालये असून काही रुग्णालयांमध्ये पार्टनरशिप देखील आहे. यापार्श्‍वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी मंगळवारी वैद्यकीय विभागाचे अधिकारी व रुग्णालयातील डॉक्‍टरांची बैठक बोलाविली त्यात खडेबोल सुनावताना खासगी रुग्णालयांमध्ये सेवा देण्याबरोबरचं स्वमालकीचे क्‍लिनिक, दवाखाने आढळल्यास थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचा ईशारा दिला आहे. 
 
Web Title: MARATHI NEWS MEDICIAL PRACTICE