59 हजार कोटीचा चोकसीचा घोटाळा दुर्लक्षित: देवांग जानी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

नाशिक : मेहुल चोकसीची गीतांजली जेम्स लिमिटेड आणि तिच्यासह सहयोगी 19 बनावट कंपन्यांनी पंजाब नॅशनल बॅंक व्यतिरिक्त इतर सार्वजनिक आणि खासगी 
बॅंकाकडून मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेर्सच्या यादीनुसार 53,898 कोटींचे कर्ज आणि खेळत्या भांडवलाची सुविधा घेतली. पण वषार्पासून संबधितावर कारवाई होत नाही. असा आरोप माहीती आधिकार कार्यकर्ते देवांग जानी यांनी केली. 

  जानी म्हणाले, मेहुल चोकसी यांच्या 19 कंपन्यापैकी 15 कंपन्या एकाच पत्त्यावर आहे. त्यांनी 19 वित्त संस्थाकडून 13977 कोटीचे कर्ज घेतले. नक्षत्र बॉण्ड 
नावाखाली 1493.35 कोटी, नक्षत्र वल्डर्‌ लिमिटेड 443.50 कोटी, बीईझेल ज्वेलरी लिमिटेड 200 कोटी, गिली इंडिया लिमिटेड 1178 कोटी, गितांजली लाईफ स्टाईल 75 कोटी, नाशिक मल्टी सव्हिर्सेस 3862.73 कोटी, युरेका फिनस्टोक 5305 कोटी, डिसेंट इन्व्हेस्टमेंट ऍण्ड फाननान्स 5280 कोटी, 
गीतांजली इन्फ्राटेक लिमिटेड 245कोटी 34 लाख, एन एन्ड जे फिनस्टोक्‍स प्राव्हेट लिमिटेड 300.50 कोटी, माया रिटेल लिमिटेड 14 कोटी, एमएमटीसी गीतांजली लिमिटेड 30 कोटी, ज्वेलशौक मार्केटप्लेस लिमिटेड 14 कोटी, प्रियांका जेम्स प्राव्हेट लिमिटेड 5238 कोटी, रोहन डायमंड्‌स प्राव्हेट लिमिटेड 5198 कोटी, मोझार्ट ट्रेडिंग प्राव्हेट लिमिटेड 5198 कोटी, हैद्राबाद जेम्स सेझ लिमिटेड 540.27 कोटी याप्रमाणे कर्ज उचलले आहे. हे कर्ज देशातील आघाडीच्या विविध 29 बॅकांकडून घेतले असून सध्य केवळ पंजाब नॅशनल बॅक आणि स्टेट बॅकेसारख्या मोजक्‍या बॅकांच्याच कर्जाची चर्चा असून इतर बॅकातील कर्जाची चौकशी झाली पाहिजे. 

Web Title: marathi news mehaul chokshi