मुस्लिम शेतकऱ्यांने केली गाय दान! 

muslim farmer cow
muslim farmer cow

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : वडगाव लांब येथील गोशाळेत गोवंश वाचविण्यासाठी धडपड करणाऱ्या रविदासजी महाराज यांच्या कार्याला सलाम करत गोंडगाव (ता. भडगाव) येथील दोन शेतकऱ्यांनी दोन गायी दान दिल्या. यात विशेष म्हणजे एका मुस्लिम शेतकऱ्यानेही आपले दातृत्व सिद्ध केले आहे. त्यांच्या या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. 


गाय अन तिच वासरू... हे नातं आई-बाळाच्या नात्याप्रमाणेच असतं. लहानपणापासूनच बाळाला हम्बा हम्बा.. असं म्हणत गायीची ओळख करून देण्यात येते. खेडो-पाड्यात गायी, कमी होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमावरील गोशाळेचे गोसेवक ह. भ. प. रविदासजी महाराज यांच्याकडे लहान मोठे सुमारे २०० गावराणी गाई आहेत. पंधरा वर्षांपासून याठिकाणी ही गोशाळा आहे. येथे नुकतेच गोंडगाव (ता. भडगाव) येथील मुस्लिम शेतकरी मुश्ताक अहमद व रामा वाघ या दोन्ही शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक गाय अशा दोन गायी गोसेवक रविदास महाराज यांच्याकडे सुपूर्द केल्या. 


गोंडगाव (ता. भडगाव) येथील मुस्लिम शेतकरी मुश्ताक अहमद या शेतकऱ्यांने चारा नसल्याने गायीचे होणारे हाल त्यांच्याकडून पाहिले जात नव्हते. यामुळे त्यांनी ही गाय इतरत्र कुठेही न देता गावातील उमेश देवा ठोंबरे यांना ते भेटले. त्यांनी त्याला वडगाव लांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमावरील गोशाळेला ही गाय देऊन टाका, असे सांगत मुश्ताक अहमद यांनी ही गाय स्वतः तेथे आणून दिली. एका मुस्लिम शेतकऱ्यांचे गायी विषयी असलेले प्रेम पाहुन अनेकजण भारावले. 

चारा दान करण्याचे आवाहन 
वडगावलांबे (ता. चाळीसगाव) येथील वटेश्वर आश्रमावरील गोशाळेत वैरण नसल्याने लहान मोठे पंधरा गायी दगावल्या होत्या. यामुळे या ठिकाणाचा चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला. या परिस्थितीमध्ये गोमातेला सहकार्य हे अत्यंत उच्च कोटीचे पुण्य प्राप्तीचे कार्य आहे. ज्यांना गायींसाठी चारा द्यायचा असेल त्यांनी या पुण्य कार्यात सहभागी करावे, असे आवाहन ह. भ. प. गोसेवक रविदास महाराज यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com