मुस्लिम,धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आता प्रयत्न-मेटे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले .

इंदिरानगर- मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मदत करणाऱ्या धनगर आणि मुस्लिम समाजाला आता त्यांचे आरक्षण देखील मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मराठा समाज एकसंघ त्यांच्या मागे उभा राहील असे मत शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी पाथर्डी फाटा येथे व्यक्त केले .

संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे भारतीय संग्राम परिषदेने आयोजित शिवसंग्राम स्नेह मेळाव्यात ते बोलत होते .प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे ,आमदार प्रा देवयानी फरांदे ,आमदार सीमा हिरे ,स्थायी समितीचे अध्यक्ष उद्धव निमसे, नगरसेवक शशिकांत जाधव ,स्वाती भामरे ,छावा संघटनेचे करण गायकर ,उदय आहेर ,संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव आदि प्रमुख पाहुणे होते
 

  आ.मेटे म्हणाले की, संघटना खाजगी उद्योगात देखील स्थानिकांना 75 टक्के जागा राखीव करण्याबाबत कायदा करावा याचा पाठपुरावा सरकार कडे करणार आहे. शेतकऱ्यांना पेन्शन मिळण्यासाठी चे 5 लाख अर्ज मुख्यमंत्र्यांना देण्यात येतील. बेरोजगारांना भत्ता मिळावा ही देखील मागणी करण्यात येणार असून वंचित घटकांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी संघटना आग्रही असेल. सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी त्यांनी एखाद्या पक्षाच्या मागे उभे राहणे ही काळाची गरज आहे हे ध्यानात घेतले पाहिजे 
 

मेटे यांच्या उपस्थितीत आज योगिता आहेर,संतोष अडांगळे, अशोक सोनवणे ,रवी अडांगळे, अस्मिता देशमाने ,डॉ माधवी गायकवाड, गणेश पुरे, वैशाली कोल्हे ,मीना टिळे,अविनाश देशमाने आदींनी शिवसंग्राम मध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांनी स्वागत केले. मराठा आरक्षणात धडाडीने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेश कदम, किरण ओव्हळ, भरत लगड, कल्याण अडांगळे ,हंसराज वडघुले ,नितीन रोटे ,शरद तुंगार आदींसह शिवसंग्राम संघटनेचे कार्यकर्ते आणि विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mete andolan