टायरबेस मेट्रोचा  अहवाल सप्टेंबरअखेर, व्यवहार्यता, मसुद्याच्या आधारावर मुहूर्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नाशिक ः देशातील पहिल्या टायरबेस मेट्रोचा विस्तृत प्रकल्प अहवाल जुलैअखेर शासनाला सादर होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांसह महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी घोषित केले असले, तरी प्रत्यक्षात विस्तृत माहिती सादर करण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे गुरुवारी (ता. 1) महापालिकेत झालेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. सप्टेंबरअखेर केंद्र सरकार अंगीकृत राइट्‌स कंपनीकडून विस्तृत अहवाल सादर केला जाणार आहे. शासनाला आतापर्यंत फक्त प्रकल्पाचा मसुदा सादर करण्यात आला आहे. त्याआधारे निवडणुकीपूर्वी मेट्रो निओचा नारळ वाढविण्याची तयारी भाजपकडून सुरू झाली आहे. 

नाशिकमध्ये मेट्रो रेल्वे व्यवहार्य नसल्याने एलिव्हेटेडवर आधारित टायरबेस जोडबस चालविली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळासह मंत्रालयात सादरीकरणाद्वारे माहिती दिली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी महापालिकेत घेतलेल्या बैठकीत हे जाहीर केले. संघटना, आमदारांसमोर सादरीकरण करताना जुलैअखेर शासनाला अहवाल सादर केला जाईल व मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देऊन केंद्राकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे.

देशातील पहिली टायरबेस सेवा राहणार असून, नाशिकमध्ये प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर श्रेणी-2 च्या शहरांत टायरबेस मेट्रोचा "नाशिक पॅटर्न' राबविला जाईल. प्रकल्पासाठी 2000 कोटींचा खर्च येणार असून, त्यासाठी 60 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरूपात व प्रत्येकी 20 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन उभारणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जुलैअखेर राइट्‌स कंपनीला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या असताना, प्रत्यक्षात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झाली नाही.

सप्टेंबरअखेरपर्यंत विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करून शासनाला सादर केला जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी माहिती देण्यात आली. शासनाला जुलैअखेर विस्तृत प्रकल्प अहवाल सादर करण्याऐवजी प्रकल्पाचा मसुदा सादर केल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिल्याने त्याच मसुद्याच्या आधारे प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते. 

पायाभूत सुविधा, धोक्‍यांचा अभ्यास 
एकूण 31.40 किलोमीटरचे दोन मार्ग व दोन फीडर मेट्रो मार्ग राहणार आहेत. मेट्रोच्या मार्गातील अडथळे, बीएसएनएल, महावितरण कंपनीच्या वाहिन्या, मार्गात येणारे अतिक्रमण हटविण्याची तयारी, नागरिकांचा विरोधाची शक्‍यता, पावसाळी व ड्रेनेज लाइन, द्वारका येथील उड्डाणपुलाच्या क्रॉसिंगवर येणाऱ्या अडचणी आदींचा अभ्यास विस्तृत अहवालात केला जाईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news METRO NEO