"मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया'साठी पुणे विद्यापीठातर्फे 21 ला परीषद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे मिशन यंग ऍण्ड फिट इंडिया या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी एक दिवस परीषद आयोजित केली आहे. विद्यापीठ प्रांगणात 21 मेस होत असलेल्या या परीषदेस मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर उपस्थित राहणार आहे.

या एक दिवसीय कार्यशाळेतील विविध सत्रात तज्ज्ञांतर्फे मार्गदर्शन केले जाणार आहे. परीषदेसाठी पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्य, संचालकांना आमंत्रित केले आहे. या परीषदेत सचिन तेंडूलकर हा विद्यार्थ्यांसाठी शारीरीक व मानसिक स्वास्थयाचे महत्व याविषयावर उपस्थितांशी संवाद साधणार आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील धोरण ठरविणारे वैक्‍तिमत्व या परीषदेत सहभागी होतांना संवाद साधणार आहेत.

यासंदर्भात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र पाठवून आमंत्रित केले आहे. तसेच क्रीडा व व्यवस्थापनशास्त्र शाखेच्या संचालकांनाही या परीषदेत सहभागी होण्याची संधी असणार आहे. परीषदेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन स्वरूपात बीसीयुडी लॉगइनद्वारे नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सोमवार (ता.14) अंतीम मुदत असेल. तसेच सविस्तर माहिती ई-मेलद्वारे विद्यापीठाला पाठवायची आहे. 
 
Web Title: marathi news mission youg and fit india