#BattlleForNashik खासदार होण्यासाठी हवीत  किमान 42 टक्‍क्‍यांपुढे मते 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

नाशिक ः नाशिक लोकसभा मतदारसंघ सतराव्या निवडणुकीला सामोरा जात असताना या मतदारसंघात साधारण 42 ते 55 टक्के मतदान विजयी उमेदवारांना हवे, असे आजपर्यंतचा इतिहास सांगतो. 2009 मध्ये विजयी उमेदवार समीर भुजबळ यांना 36.34 टक्के मते पडली असतानाही ते विजयी झाले होते; परंतु त्या वेळी तिरंगी लढत झाली होती. मनसेने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतल्याने विजयी उमेदवाराचा टक्का घसरला होता. यंदाही तिरंगी लढत असली, तरी विजयी उमेदवाराला 40 टक्‍क्‍यांपुढेच मते पदरात पाडून घ्यावी लागणार आहेत. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत 16 निवडणुका पार पडल्या. त्यातील 1962 व 67, तसेच 1971 मधील निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मतांची टक्केवारी 55 च्या पुढे गेली होती. त्यानंतर 1991 व 1998 मध्ये 55 पेक्षा अधिक टक्के मतदान झाले होते. त्याव्यतिरिक्त 42 ते 55 टक्‍क्‍यांच्या आतच विजयी उमेदवाराला मतदान पडले आहे. सन 2009 मध्ये विजयी उमेदवाराला 36.34 टक्के, तर 1999 मध्ये विजयी उमेदवाराला 41.59 टक्के मतदान पडले होते. ही विजयासाठी सर्वांत कमी आकडेवारी आहे. 1971 मध्ये नाशिक मतदारसंघात विजयी उमेदवाराला सर्वाधिक 74.15 टक्के मतदान मिळाले होते. 

विजयी उमेदवारांची मतांची टक्केवारी 
वर्ष टक्केवारी 
1951 53.17 
1957 48.44 
1962 57.67 
1967 56.60 
1971 74.15 
1977 50.33 
1980 53.47 
1984 45.16 
1989 51.06 
1991 57.81 
1996 47.41 
1998 57.19 
1999 41.59 
2004 46.85 
2009 36.34 
2014 52.77 

Web Title: marathi news mla