मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिक मध्ये "सीएनजी' चा मार्ग मोकळा, महापालिकेकडून सहा हजार चौरस मीटर जागा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नाशिक- गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना हवे असलेले सीएनजी इंधन नाशिक मध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडला विल्होळी नाका येथे सहा हजार चौरस मीटर जागा देण्याची तयारी दर्शविल्याने आता मुंबई, पुणे नंतर नाशिक शहरात सीएनजी इंधनावर वाहने धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

नाशिक- गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांना हवे असलेले सीएनजी इंधन नाशिक मध्ये उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी लिमिटेडला विल्होळी नाका येथे सहा हजार चौरस मीटर जागा देण्याची तयारी दर्शविल्याने आता मुंबई, पुणे नंतर नाशिक शहरात सीएनजी इंधनावर वाहने धावण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

    शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढतं असल्याने त्यातून प्रदुषणाची समस्या निर्माण झाली आहे. सरकारकडून डिझेलवर चालणारी वाहने टप्प्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला पर्याय म्हणून बॅटरी, ईलेक्‍ट्रीक व सीएनजी इंधनावर धावणारी वाहने चालविली जाणार आहे. नाशिक मध्ये सीएनजी इंधनासाठी पर्याय नाही. सन 2014 मध्ये सीएनजी इंधनासाठी शासन स्तरावरून प्रयत्न करण्यात आला होता परंतू त्यानंतर सरकार बदलल्याने आतापर्यंत विचार झाला नव्हता. गेल्या दिड, दोन वर्षांपासून शहरात सीएनजी वर आधारीत बससेवा सुरु करण्याचे नियोजन आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमीटेडने गेल्या वर्षी महापालिकेच्या अधिकायांची भेट घेवून जागा देण्याची मागणी केली होती.

महापालिकेने पाथर्डी येथील जुन्या जकात नाका येथे जागा दाखविली. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो जवळ सीएनजी युनिट स्थापन करण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार आडगाव येथील जागेचा विचार झाला. परंतू महापालिकेने रेडीरेकनरच्या सहा टक्के दराने भाडे आकारण्याचा प्रस्ताव सादर केल्याने नॅचरल गॅस कंपनीने नकार दिला. त्याऐवजी अडिच टक्के दराने विल्होळी नाका येथील जागेचा पर्याच सुचविण्यात आला. अखेरीस विल्होळी येथील सर्वे क्रमांक 181 मधील आरक्षित जागा अडिच टक्के दराने पंधरा वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव महासभेवर ठेवून मंजुरी मिळाल्यानंतरचं भाडे करार केला जाणार आहे. 

150 किलोमीटर पाईपलाईन? 
विल्होळी जकात नाक्‍याजवळ पाणी प्रकल्पाच्या जागे शेजारी भाडे तत्वावर जागा दिली जाणार आहे. प्रकल्पाची स्थापना झाल्यानंतर भविष्यात येथूनचं शहरात दिडशे किलोमीटर पाईपलाईन द्वारे सीएनजी इंधनाचा पुरवठा करण्याचे नियोजन आहे. महापालिकेने त्यासाठी देखील मान्यता दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mngl