"मोबाईल गेम' द्वारे आजारांना निमंत्रण 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नाशिक : नाशिक उद्यानांचे व मैदानांचे शहर म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैदाने व उद्यानांमध्ये खेळण्यासाठी जागा शिल्लक राहतं नाही. अशी आतापर्यंतची परिस्थिती होती. पण यंदाच्या वर्षी मैदानांवरील खेळ खेळणाऱ्यांच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली आहे. क्रीडा शिक्षक व डॉक्‍टरांनी हि बाब मान्य केली आहे. मोबाईल, व्हिडीओ व कॉम्प्युटर गेम खेळण्याचे प्रमाण वाढल्याचा हा परिणाम आहे. यामुळे लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटी-मोठी तीस हून अधिक मैदाने आहेत. उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी मैदाने फुल्ल असल्याचे चित्र काही वर्षांपर्यंत होते.

नाशिक : नाशिक उद्यानांचे व मैदानांचे शहर म्हणून ओळखले जाते. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये मैदाने व उद्यानांमध्ये खेळण्यासाठी जागा शिल्लक राहतं नाही. अशी आतापर्यंतची परिस्थिती होती. पण यंदाच्या वर्षी मैदानांवरील खेळ खेळणाऱ्यांच्या प्रमाणात निम्म्याने घट झाली आहे. क्रीडा शिक्षक व डॉक्‍टरांनी हि बाब मान्य केली आहे. मोबाईल, व्हिडीओ व कॉम्प्युटर गेम खेळण्याचे प्रमाण वाढल्याचा हा परिणाम आहे. यामुळे लहान मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढले आहे. शहरात छोटी-मोठी तीस हून अधिक मैदाने आहेत. उन्हाळा व दिवाळीच्या सुट्टीत तसेच शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी मैदाने फुल्ल असल्याचे चित्र काही वर्षांपर्यंत होते. गेल्या पाच वर्षात मैदानांवरील मुलांची संख्या झपाट्याने घटली आहे. यंदा पन्नास टक्‍क्‍यांनी मुले मैदानावर खेळण्यासाठी उतरली नाही. त्याऐवजी मोबाईल, व्हीडीओ व कॉम्प्युटर गेम खेळण्याकडे कल दिसला. 

मोबाईल गेम चे परिणाम 
- अभ्यासाकडे दुर्लक्ष. 
- मानसिक आजार बळावण्याची शक्‍यता. 
- शरीराची स्थुलता वाढणे. 
- मेंदुची क्रिया घटणे. 
- कमी वयातचं चष्मा लागणे. 
- चिडचिडेपणा वाढणे. 
- एकाच ठिकाणी एकाच स्थितीत बसल्याने स्पाईनचा आजार. 

कोट 
मोबाईल गेमचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळत असून मुलांनी पालकांना मोबाईल पासून दुर ठेवावे.- डॉ. अनिरुध्द भांडारकर, बालरोग तज्ञ. 

नाशिकमध्ये मुलांमध्ये नेत्र विकाराच्या तक्रारींत वाढ झाली आहे. नेत्र विकारांबरोबरचं चिडचिडेपणा, एकाग्रता नष्ट होणे आदी आजारांच्या तक्रारी वाढल्या आहेत.- डॉ. सतीश पाटील, नेत्ररोग तज्ञ. 

दहा ते बारा वर्षांपासून खेळ प्रशिक्षणाचे कॅम्प घेतो परंतू दोन वर्षात मुलांच्या उपस्थितीतचे प्रमाण पन्नास टक्‍क्‍यांनी घटले असून त्याला मोबाईल गेम जबाबदार आहे.- प्रशांत भाबड, क्रीडा प्रशिक्षक. 

खेळाच्या दृष्टीने शहरात 
- 25 ते 30 छोटी-मोठी मैदाने. 
- 481 उद्याने. 

शहरातील मुलांची संख्या 
0 ते 5 वयोगट- 45,000 (अंदाजे) 
6 ते 14 वयोगट - 2,75,000 
15 ते 16 वयोगट- 48,000 

Web Title: marathi news mobile game

टॅग्स