#BattleForNashik कांदा, द्राक्षांच्या आगारातून  17 ला मोदींची तोफ धडाडणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पिंपळगाव बसवंत ः शेतीमालाच्या दरात मोठी पडझड झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उसळलेली संतापाची लाट शमविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोफ कांदा, द्राक्षांच्या आगारातून धडाडणार आहे. येत्या 17 एप्रिलला पिंपळगावच्या जोपुळ रस्त्यातील नवीन बाजार समितीलगतच्या प्रांगणातून मोदींची सभा होईल. आमदार अनिल कदम, डॉ. राहुल आहेर व पोलिस प्रशासन, महसूल, बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी आज सभेच्या नियोजित ठिकाणाची सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहाणी केली. 

नाशिक, दिंडोरी, धुळे या तीन मतदारसंघांचे मध्यवर्ती केंद्र म्हणून पिंपळगाव बसवंत शहरात मोदी यांची सभा होत आहे. मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांसह अनेक मंत्री उपस्थित राहाणार असल्याने ही सभा भव्यदिव्य राहण्याची शक्‍यता आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी हे दहा वर्षांपूर्वी पिंपळगावला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारसभेसाठी आले होते. त्यानंतर ही बहुचर्चित सभा यशस्वी करण्यासाठी युतीचे पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान मोदी हे हेलिकॉप्टरने बाजार समितीच्या प्रांगणात येतील. बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयात काही वेळ थांबून ते थेट सभेस्थळी येतील. मोदींच्या सभेमुळे तीन मतदारसंघातील युतीच्या उमेदवारांची स्थिती अधिक पूरक होईल, असा विश्‍वास आमदार अनिल कदम यांनी व्यक्त केला आहे.  
 
Web Title: marathi news modi