हॉकर्स झोनच्या आक्रोश मोर्चात "मुंढे गो बॅक'च्या घोषणा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

नाशिकः शहर फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा भाग म्हणून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून शहराच्या विविध भागांत रस्त्यांवरील विक्रेते, टपरीधारक, फेरीवाले हटविले जात आहेत. अतिक्रमण निर्मूलन कारवाईविरोधात सर्वपक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीतर्फे महापालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आंदोलनकर्त्यांनी "मुंढे गो बॅक'च्या घोषणा दिल्या.

बी. डी. भालेकर हायस्कूल मैदानापासून सकाळी मोर्चा निघाला. शालिमार, सीबीएस, शरणपूरमार्गे हा मोर्चा राजीव गांधी भवनावर धडकला. हॉकर्स-टपरीधारक कृती समितीचे नेते व भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, सय्यद युनूस, शशिकांत उन्हवणे, शिवाजी भोर, संदीप जाधव, अजय बागूल, पुष्पा वानखेडे, नवनाथ ढगे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. शहर फेरीवाला धोरण अमलात आणताना तयार केलेले हॉकर्स झोन जागेवर बसून करण्यात आले आहेत. यातून हॉकर्सचे हित दृष्टिआड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. महापौरांनी त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठक घेऊन फेरीवाला झोनबद्दल फेरविचार करण्याचे आश्‍वासन दिले होते;

  कुठलाही विचार न करता प्रशासनाने धोरणाची एकतर्फी अंमलबजावणी सुरू केल्याने टपरीधारकांवर अन्याय होत असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार शहर फेरीवाला समिती स्थापन करून समिती सदस्यांच्या सूचनेनुसारच हॉकर्स झोन आखावेत, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नये आदी मागण्या अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या. मालमत्ता करातील वाढ रद्द करण्याचीही मागणी केली. महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या भाषणात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले. 
 
Web Title: marathi news morcha