मोसम नदी स्वच्छता मोहिमेत ६० टन कचऱ्याचा उपसा

river safai
river safai

मालेगाव : शहरातील मोसम नदी स्वच्छतेसाठी बुधवारी महापालिका,महसूल,पोलिस,पंचायत समिती यंत्रणा सरसावल्या. त्यांना शिवसेना,स्वस्त धान्य दुकान संघटना,राष्ट्रीय एकात्मता समिती,शिक्षक संघटना,तालुका क्रेशर संघटना व वीटभट्टी प्रतिनिधींचे सहाय्य झाले. नदी स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या मोहिमेत सायंकाळपर्यंत ६० टनहून अधिक ओला-सुका कचऱ्याचा उपसा करण्यात आला. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नदीपात्रातील सांडपाण्यात उतरून पाणी वाहते करण्यासाठी दगडधोंडे व कचर काढला.

श्री. भुसे यांच्या पुढाकाराने महापालिका आयुक्त संगिता धायगुडे, अपर पोलिस अधिक्षक हर्ष पाेद्दार, तहसिलदार ज्याेती देवरे, उपअधिक्षक गजानन राजमाने, अजित हगवणे, गटविकास अधिकारी आनंद पिंगळे व सहकाऱ्यांनी ही मोहिम राबविली. सकाळी नऊला माेहिमेस सुरवात झाली. मोसमनदी पात्राला असलेले गटारगंगेचे स्वरुप किमान सामान्य रुग्णालय ते रामसेतू पूल या दरम्यान दूर करण्यास काही प्रमाणात प्रशासनाला यश आले. नदीपात्रातील साचलेले डबके वाहते झाले. द्याने ते अल्लमा एकबाल पुल या दरम्यान नदीपात्रात मधोमध पाणी वाहणारा नाला तयार व्हावा यासाठी श्री. भुसे यांचा सायंकाळपर्यंत लकडा सुरु होता. मोहिम संपवून अधिकारी, कार्यालयात परतल्यानंतरही शिवसेना नगरसेवक व कार्यकर्ते स्वच्छता मोहिम राबवित होते. अन्य राजकीय पक्ष, पदाधिकारी व नागरिकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली. 

नदी स्वच्छता अभियानमध्ये नदीपात्रील काटेरी झुडूपे, झाडे, पानवेली काढण्यात आल्या. द्याने फर्शीपुलाजवळ नदीपात्र पानवेलींनी वेढले आहे. नदी किनारी असलेली माती व कचरा जेसीबीच्या सहाय्याने किनाऱ्यावर टाकून रस्ता स्वरुपात काही भाग साकारण्यात आला. १५ जेसीबी नदीपात्रातील कचरा उपसून पाणी वाहते करीत हाेते. ट्रॅक्टर, डम्परच्या मदतीने तातडीने कचरा उचलणण्यात येत होता. मोहिमेसाठी द्याने ते कॅम्प गणेशकुंड परिसरात पंचायत समितीतर्फे स्वच्छता केली जाईल. कॅम्प गणेशकुंड ते सामान्य रुग्णालय महसूल प्रशासन, सामान्य रुग्णालय ते आंबेडकर पूल पोलिस अधिकारी, कर्मचारी व आंबेडकर पूल ते अल्लमा एकबाल पूल महापालिका असे चार टप्पे करण्यात अाले होते. 

नदी स्वच्छता 
* १५ जेसीबी मशीन
* कचरा वाहन्यासाठी १५ ट्रॅक्टर, २ डम्पर, ३ टिप्पर
* नदीपात्रात खडक फोडण्यासाठी ब्रेकरची मदत
* स्वच्छता मोहिमेत विविध यंत्रणांसह एक हजारहून अधिकांचा सहभाग
* महापालिकेचे प्रत्येक विभागासाठी २५ स्वच्छता कर्मचारी
* स्वच्छता मोहिमेत २० पोलिस अधिकारी व दीडशे पोलिस कर्मचारी सहभागी
* ६० टनहून अधिक कचऱ्याचा उपसा
* नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर केर कचरा व पालापाचोळा जाळण्यात आला.
* नगरसेवक राजाराम जाधव व श्रीराम मंडळातर्फे मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना नाश्‍ता
* नगरसेवक वगळता नागरिकांचा अल्प सहभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com