माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

देवळाली कॅम्प : "माजी खासदार राजाभाऊ गोडसे अमर रहें...' "जबतक सूरज-चॉंद रहेगा राजाभाऊ तुम्हारा नाम रहेगा...' "शिवसेनेचा ढाण्या वाघ' अशा घोषणांमध्ये शनिवारी (ता. 18) देवळाली कॅम्प शहर व संसरी गावच्या स्मशानभूमीत माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. दारणा नदीत तरुणपणी पोहण्याचा आनंद घेणाऱ्या गोडसे यांच्या अंत्यसंस्कारावेळी दारणाकाठ निःशब्द झाला होता. या वेळी राजकारणासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिकांनी लाडक्‍या नेत्याला अलविदा केला. 

राजाभाऊंचे मूत्रपिंडाच्या आजाराने शुक्रवारी (ता. 17) सायंकाळी पाचला निधन झाले. शनिवारी सकाळी आठला लॅम रोड भागातील देवळाली सुपरस्पेशालीटी हॉस्पिटलपासून सजविलेल्या वैकुंठरथातून राजाभाऊंच्या अंत्ययात्रेस सुरवात झाली. संसरी चौफुलीमार्गे आनंद रोड, वडनेर रोड, हौसन रोडमार्गे संसरी गावातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आली. त्यानंतर दारणा नदीकाठीच्या स्मशानभूमीत राजाभाऊ यांचे पुत्र युवराज गोडसे यांनी चितेला अग्निडाग दिला. या वेळी उपस्थितांनी "राजाभाऊ अमर रहें'च्या घोषणा दिल्या.

या वेळी मविप्रच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार जयंत जाधव, माजी महापौर अशोक मुर्तडक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार राजाभाऊ वाजे, माजी महापौर दशरथ पाटील, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, लक्ष्मण मंडाले, शिवाजी चुंभळे, राहुल दिवे, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते विश्‍वनाथ काळे, आचार्य रामकृष्णदास महाराज लहवितकर यांनी राजाभाऊ यांच्या कार्याला उजाळा दिला. या वेळी खासदार हेमंत गोडसे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षा मीनाताई करंजकर, माजी उपाध्यक्ष तानाजी करंजकर, विलास पवार, ज्येष्ठ नगरसेवक बाबूराव मोजाड, सचिन ठाकरे, तानाजी भोर,आदी उपस्थित होते. 

Web Title: marathi news mp godse passaway