नाशिकमध्ये उद्यापासून राष्ट्रीय एमआरएफ मोग्रीप दुचाकीचा थरार 

residentional photo
residentional photo

नाशिक एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय दुचाकी अजिंक्‍यपद स्पर्धेची तिसरी फेरी उद्या(ता.13) पासून नाशिकला सुरू होत आहे. उद्या दिवसभर कागदपत्र,वाहन तपासणी,रेकी,मोटारसायकलस्वारांना मार्गदर्शन केले जाईल. रविवारी(ता.13) घोटी परिसरात मुख्य स्पर्धेला सुरवात होणार आहे. या रॅलीत यंदा पहिल्या दोन्ही फेऱ्या जिंकणाऱ्या राजेंद्र आर.ईचे गतविजेता नटराजसमोर कडवे आव्हान असेल. नटराजची नाशिकमधील कामगिरी राष्ट्रीय जेतेपदाचे भवितव्य निश्‍चित करणारी ठरेल. 

ए.डब्लू इव्हेन्टस्‌तर्फे पुन्हा एकदा मोटार क्रीडाप्रेमींसाठी राष्ट्रीय दुचारी अजिंक्‍यपद स्पर्धा पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. रॅलीचे क्‍लर्क ऑफ द कोर्स अमित वाघचौरे यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली. यावेळी प्रशांत गडकरी,रवि वाघचौरे, चीफ ऑफ मार्शल किरण वाघचौरे आदी उपस्थित होते. श्री.वाघचौरे म्हणाले,या रॅलीसाठी सुरवातीला आम्ही दिंडोरीजवळील कालव्याचा परिसर निश्‍चित केला होता मात्र जास्त पावसामुळे आमचे नियोजन कोलमडले. त्यानंतर आता आम्ही घोटी फाटा,धारनोली,बाहुली डॅमचा परिसर निश्‍चित केला. रॅलीचे एकूण अंतर 98 किलोमिटरचे असून याच मार्गावर प्रत्येकी चारवेळा चालक ये-जा करतील. यंदा पावसाने चांगला जोर धरल्याने घोटी वैतरणा परिसरातील मुसळधार पाऊस,चिखल आणि वळणाच्या रस्त्यामुळे चालकाचे कसब पणाला लागणार आहे. गोदाश्रध्दा फाऊंडेशन,द ग्रीन हेरिटेज रिसॉर्ट, सोल मेन्स वेअर यांचे सहकार्य लाभले. 

नामांकितांच्या सहभागामुळे चुरस 
विदेशी बनावटीच्या गाड्यांबरोबरच भारतीय बनावटीच्या मोटरसायकल,बुलेट,स्कूटर आदी चालकांचे सर्वीत्तम कसब यानिमित्ताने बघायला मिळेल. गेल्या काही वर्षापासून राष्ट्रीय अजिंक्‍यपदावर आपली छाप सोडणाऱ्या नटराजला या हंगामाच्या सुरवातीलाच पहिल्या दोन्ही फेर्याध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. इंदूरच्या पहिल्या फेरीत त्याचा धक्कादायक पराभव करून राजेंद्रने विजयी सलामी दिली. पुण्यात सलग तिसऱ्यांदा नटराजवर मात करत राजेंद्रने यंदाच्या हंगामात काही तरी चमत्कार घडविण्याचे संकेत दिले आहे त्यामुळे नाशिकच्या फेरीत नटराज समोर मोठा दबाव असेल. विदेशी बनावटीच्या मोटारसायकल गटात पॅरीस डकार स्पर्धेत नुकताच सहभागी झालेला अब्दुल वाहिदच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. 

शमीम खानचे आकर्षण 
स्कूटर गटात नाशिकच्या शमीम खानने मागील हंगामाच्या अपयशानंतर यंदा पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. पुण्यात त्याने जेतेपदाची माळ घातली होती. नाशिकमध्ये त्यांच्या समोर गतविजेता पिंकेश ठक्कर, 2017 चा राष्ट्रीय विजेता सैय्यद आसिफ अली यांचे कडवे आव्हान असेल. यश मोहन पवार,हितेन ठक्कर,निलेश ठाकरे हे नाशिककर चालक घरच्या मैदानात कशी कामगिरी करतात याकडे उत्सुकता असेल.नाशिकचा युवराज पाटील हा विदेशी बनावटीच्या फॉरेन एक्‍सपर्ट गटात सहभागी होत असून यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा टीव्हीएस टिमसह 50 चालकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. 


स्टार ऑफ नाशिक... 
या गटात अवघ्या पाच प्रवेशिका असून हर्षल कडभाने, कौस्तुभ मच्छे,कुणाल घायाळ,आदित्य ठक्कर,नवदीप राव हे अनुभवी चालक एकमेकांशी स्पर्धा करतांना दिसती. तेरा किलोमिटरची एक अशा चार फेऱ्यात ही स्पर्धा हीोल. 52 किलो मिटर स्पर्धात्मक तर 46 किलो मिटर वाहतूक मार्ग असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com