"एसी' प्रवासाची एसटीला पाच कोटी रुपयांची झळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नाशिक - सामान्य प्रवाशांचा प्रवास वातानुकूलित बसगाडीतून सुखकर व्हावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सहा महिन्यांत पाच कोटींची झळ सहन केली. "एसटी'ने करारावर घेतलेल्या खासगी वातानुकूलित बसगाडीवरील खर्च उत्पन्नापेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. 

एसटी प्रशासनाला के. व्ही. शेट्टी यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली असता, एसटीचे जनमाहिती अधिकारी सु. गो. खासनीस यांनी वरील माहिती दिली. 

जून ते नोव्हेंबर 2017 दरम्यान खासगी करारावर घेतलेल्या वातानुकूलित बसगाडीवरील खर्च, त्यातून मिळालेले उत्पन्न याची माहिती शेट्टी यांनी मागितली होती. त्याला दिलेल्या उत्तरानुसार, उत्पन्न 14 कोटी 69 लाख 25 हजार 441 रुपये मिळाले. मात्र, इंधनावर 10 कोटी 49 लाख सहा हजार 215 रुपये खर्च झाले. पथकरापोटी दोन कोटी 51 लाख 2 हजार 17 रुपये भरावे लागले. प्रतिकिलोमीटरप्रमाणे करारावर घेतलेल्या बसगाड्यांपोटी सहा कोटी 24 लाख 77 हजार 991 रुपये मोजावे लागले. शासनाला प्रवासी करापोटी 80 लाख 80 हजार 899 रुपये द्यावे लागले आहेत. खासगी वातानुकूलित बसगाडीमधून आर्थिक नफ्याची माहिती उपलब्ध नाही, असे त्यात म्हटले आहे. वरील आकडेवारी पाहता खासगी वातानुकूलित बसगाडीमधून एसटीला सुमारे पाच कोटींची झळ सोसावी लागत असल्याचे चित्र आहे. 

Web Title: marathi news MSRTC st bus Private air-conditioned bus transport costs more than income