लंडनच्या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटनचा डंका, जगातील पर्यटकांनी दाखविला रस 

live
live

लंडन ः लंडनमध्ये आजपासून सुरु झालेल्या "वर्ल्ड ट्रेड मार्ट' प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्र पर्यटन विभागाने पर्यटन संधींची माहिती जगातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनातील महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकाऱ्यांची भेट देत ताडोबा अभयारण्यापासून समुद्रकिनारे, गुंफा, गडकिल्ले, व्याघ्र पर्यटन, कास पठारसारखे जागतिक वारसास्थळे, तीर्थक्षेत्रे, थंड हवेची ठिकाणे, जंगलांची माहिती घेतली. 

पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात भेट देण्यासाठी यावे, असे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी दिले. "वर्ल्ड ट्रेड मार्ट' आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलचे उद्‌घाटन झाले. वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर आदी उपस्थित होते. 

पर्यटन संस्थांशी "बी-टू-बी' बैठकी 
आइसलॅंड ट्रॅव्हलरच्या व्होन पीच, स्नॅप प्रॉडक्‍शनच्या साशा आरु, आय ऍम्बेसिडर ट्रॅव्हल नेटवर्कचे निकोलस मोन्टमागी, केथ जेनकिन्स, वर्ल्ड-शो मिडीयाचे अलेक्‍झांडर कोलीस, पुरातत्व शास्त्रविषयातील पत्रकार डेव्हीड कीज, ट्‌वीटरचे रुचित उप्पल आदी समवेत "बी-टू-बी' बैठकी झाल्या. ओरिसाचे पर्यटन मंत्री जोतीप्रकाश प्रजापती, सचिव विशालकुमार देव, पर्यटन संचालक सचिन जाधव, दिल्लीच्या पर्यटन सचिव रश्‍मी वर्मा यांच्यासह भारतातील विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला भेट दिली. 

मेराकी कम्युनिकेशन्सची संकल्पना 
महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, खाद्य संस्कृती, बॉलीवूड चित्रनगरी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव आदींची माहिती प्रदर्शनात देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटनचा आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मेराकी कम्युनिकेशन्स यांनी या स्टॉलची संकल्पना आणि बांधणी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com