मी’च उमेदवार असल्याचे समजून कार्य करा : आमदार खडसे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी खडसे नाही, तर ‘मी’च उमेदवार असल्याचे समजून रोहिणी यांच्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार सर्व कार्यकर्ते पुन्हा सातव्यांदा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. 

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघासाठी रोहिणी खडसे नाही, तर ‘मी’च उमेदवार असल्याचे समजून रोहिणी यांच्यासाठी कामाला लागा, असे आवाहन आमदार एकनाथराव खडसे यांनी कार्यकर्त्यांना केले. त्यानुसार सर्व कार्यकर्ते पुन्हा सातव्यांदा मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रावर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. 

मुक्ताईनगर मतदारसंघासाठी भाजपने यंदा आमदार खडसे यांना तिकीट नाकारून त्यांची कन्या ॲड. रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुक्ताईनगर विधानसभा म्हणजे आमदार खडसे हे समीकरणच तुटल्याने भाजप- शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते नाराज झाले होते; परंतु आमदार खडसे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पक्षादेश हा अंतिम असतो आणि रोहिणी खडसे म्हणजेच एकनाथराव खडसे हे ठासून सांगितले. गेली तीस वर्षे जसे माझ्यामागे उभे राहिले, तसेच रोहिणी खडसे यांच्यामागे उभे राहण्याचे आवाहन केले. 

गेल्या तीस वर्षांपासून आमदार खडसे यांनी मतदारसंघात विविध विकासकामे केली. प्रत्येकाच्या वैयक्तिक कामात मदत केली, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रक्षा खडसे यासुद्धा विविध कामे करीत आहेत. यातून प्रत्येक व्यक्ती सोबत खडसे परिवाराचे ऋणानुबंध जुळले आहेत. तसेच रोहिणी खडसे या गेल्या चार वर्षांपासून जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. जिल्हा बँकेत त्यांनी भरीव कार्य केले आहे. बारा वर्षे बंद असलेला मुक्ताई सहकारी साखर कारखाना खासगी तत्त्वावर सुरू करून, यशस्वी पाच गळीत हंगाम पूर्ण करून दाखविले आहेत. मुक्ताईनगर येथील मुक्ताई सहकारी सूतगिरणी सुरू करून त्यांनी महिला- युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जळगाव जिल्हा भाजप सरचिटणीसपदावर कार्य करीत असल्याने पक्षसंघटनचा त्यांना अनुभव आहे. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा असल्याने त्या शैक्षणिक क्षेत्रात आणि अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव शाखेच्या अध्यक्षा म्हणून त्या सांस्कृतिक क्षेत्रातसुद्धा कार्यरत आहेत. यातून त्यांच्या कार्याची सर्व जिल्हाभर आणि मतदारसंघात ओळख आहे. त्यामुळे सध्यातरी मुक्ताईनगर मतदारसंघात रोहिणी खडसे यांचे पारडे जड वाटत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar khadse candidate prachar