Vidhan sabha 2019 : आमदार खडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मुक्ताईनगर ः माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भाजप तर्फे मुक्ताईनगर विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली असून उद्या (ता. १) सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 

मुक्ताईनगर ः माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांची भाजप तर्फे मुक्ताईनगर विधानसभेसाठी उमेदवारी निश्चित झाली असून उद्या (ता. १) सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. 

यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा बँकेचे चेअरमन रोहिणी खडसे, मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश ढोले, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बोदवड पंचायत समिती सभापती गणेश पाटील, तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, भागवत टीकारे, पराग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास धायडे, कैलास चौधरी, प्रल्हाद जंगले, नगराध्यक्ष नजमा तडवी, अनिता येवले, मुमताज बी शेख बागवान, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील, ताहेर खा पठाण, दीपक वाणी यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar khadse election form