उशिरा का होईना पक्षाचा निर्णय चांगला अन्‌ तो मान्य ः खडसे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुक्‍ताईनगर ः गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षात निष्ठेने काम केले आहे. पक्षाकडून यादी जाहीर करताना आपल्याला तिकिट दिले नसले तरी रोहिणी खडसे यांचे नाव अंतिम यादीत जाहीर केले. उशिरा का होईना पक्षाने चांगला निर्णय घेतला; त्या निर्णयाचे स्वागत आहे. यामुळे आता भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले. 

भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या चार याद्यांमध्ये नाव न आल्याने आपली भुमिका मांडण्यासाठी आमदार खडसे यांनी मुक्ताईनगरला पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले, की भाजपने रोहिणी खडसे यांचे नाव अंतिम यादीत जाहीर केल्याने आज त्यांचा अर्ज भरणार आहे. निर्णय कटू असले तरी स्विकारत आलो. पक्ष बदनाम होईल असे काम केले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहचवल्या, याची पक्षाने दखल घेतली. भाजपच्या माध्यमातून केलेले काम लक्षात घेत, भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करायचे आहे. घरात अडचण येत असतात पक्षाचा विषय तर फार मोठा आहे. पक्षाकडून उशिरा का होईना चांगला निर्णय घेतला आहे. रोहिणी खडसे या युवा असून, त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. मतदार संघात देखील त्या परिचीत आहे. यामुळे सर्वांनी भाजपला विजयी करा, सहकार्य करा. कामाला लागण्याच्या सुचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar khadse press confernce