जिल्ह्यात मुक्ताईनगर तालुक्यामध्ये सर्वांत जास्त जलवाहतूक 

दीपक चौधरी
मंगळवार, 2 जुलै 2019

मुक्ताईनगर : गेल्या अनेक दशकापासून आजपर्यंत तालुक्यातील तापी किनाऱ्यावरील सात गावातील जनतेकडून होडीने प्रवास सुरू असून दिवसाला दीड हजार प्रवासी होडीने प्रवास करतात. जळगाव जिल्ह्यात सर्वांत जास्त जलमार्गाचा वापर मुक्ताईनगर तालुक्यात होत आहे. 

मुक्ताईनगर : गेल्या अनेक दशकापासून आजपर्यंत तालुक्यातील तापी किनाऱ्यावरील सात गावातील जनतेकडून होडीने प्रवास सुरू असून दिवसाला दीड हजार प्रवासी होडीने प्रवास करतात. जळगाव जिल्ह्यात सर्वांत जास्त जलमार्गाचा वापर मुक्ताईनगर तालुक्यात होत आहे. 

सत्तरच्या दशकात आकारात आलेल्या हतनूर धरण प्रकल्पाने जिल्ह्यातील रावेर मुक्ताईनगर तालुक्यात जलमार्गाने वाहतूक अधिक सुलभ व सोईचा गणली जात होती. युती शासनाचा काळात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा प्रयत्नाने तापी नदीवरील हतनूर धरण, पिंप्रीनांदू, पूर्णा नदीवरील खामखेडा, धुपेश्वर पूल बांधले गेल्याने रस्त्यांचा वापर वाढला असला तरी कमी वेळेत मुक्ताईनगर व रावेर तालुक्याला जोडणारा मार्ग म्हणजे अंतुर्ली ते चांगदेव दरम्यानचा तापी नदीचा जलमार्ग याला अधिक पसंती दिली जाते. कमी वेळेत रावेर तालुका गाठता येत असल्याने या जलमार्गाने दिवसातून दीड हजार प्रवासी होडीने प्रवास करतात. 

सात गावातून सुविधा 
तापी नदीतून होडीद्वारे प्रवासासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील सात गावातून आज प्रवासी वाहतूक केली जाते. यात अंतुर्ली येथून दोधा, मेंढोदे येथून सुलवाडी, शेमळदे - कोळदा, पंचाणे - कांडवेल, मेळसांगवे - चांगदेव, चांगदेव - कांडवेल, चिंचोल - पुरी गलवाडे अशा सात ठिकाणावरुन प्रवासी वाहतुकीसाठी होडीची सुविधा उपलब्‍ध आहे. दररोज येथून प्रवासी वाहतुकीची सोय कार्यरत आहे. यापुर्वीही मुक्ताईनगर-खामखेडा व कुऱ्हा-धुपेश्वर दरम्यानही होडी चालायची, मात्र पंधरा वर्षांपूर्वी खामखेडा व धुपेश्वर पुल बांधले गेल्यामुळे ही जलवाहतूक बंद पडली. 

पाच ते पंधरा किमीचा वाचतो फेरा 
मुक्ताईनगर ते रावेर होडीद्वारा प्रवास केल्यास कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त पंधरा किमी अंतराचा फेरा वाचतो. सकाळी ७ ते सांयकाळी ५ दरम्यान होडीचा फेऱ्या सुरु सातत्याने सुरू राहतात. तातडीची सुविधा हवी असल्यास पैल तीरावर आवाज उभी असलेल्या होडी काही मिनिटात उपलब्‍ध होते. संत मुक्ताई व श्री संत चांगदेव यात्रोत्सवात नौकाविहाराचा आनंद लुटण्यास भाविकांची मोठी गर्दी असते. तापी काठावरील भाविक होळीने प्रवास करुनच यात्रोत्सवाला येतात. या ठिकाणी ३५ पेक्षा जास्त होड्या उपलब्‍ध आहेत. एका ठिकाणावर कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त सहा होड्या उपलब्‍ध आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muktainagar water transport