818 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अभय,109 जणांना नारळ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नाशिक : महापालिकेत अंगणावाडी कर्मचारी वगळता इतर विभागात मानधनावर घेतलेल्या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला असून स्थायी समिती अथवा महासभेवर मुदतवाढीचा कुठलाही प्रस्ताव सादर न करण्याच्या सुचना महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यामुळे पालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या 109 कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार आहे तर अंगणवाडीच्या 818 कर्मचाऱ्यांना अभय मिळणार आहे.

महापालिकेत कर्मचारी भरती होत नाही, महिन्याला सेवानिवृत्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने आस्थापनेवरील रिक्त पदांचा आकडा वाढतं आहे. त्यामुळे सेवानिवृत्त झालेल्या कर्मचायांना मानधनावर घेवून कामकाजाचा भार कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. अशा कर्मचायांची संख्या 927 आहे. यात सर्वाधिक संख्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांची आहे त्यांना पालिकेच्या वतीने मानधन दिले जाते.
 
महापालिकेतर्फे शहरात 410 अंगणवाडी आहेत. त्यासाठी सहा मुख्य सेविका व उर्वरित 408 अंगणवाडी सेविका व 410 मदतनीस आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस वगळता उर्वरित 109 कर्मचाऱ्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. तशा सुचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. एखाद्या विभागासाठी मानधनावर कर्मचारी घेण्याची गरज असेल तर तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. स्थायी समिती किंवा महासभेवर प्रस्ताव ठेवता येणार नसल्याच्या सुचना दिल्या आहेत. सध्या मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचायांची मुदत संपल्यानंतर त्यांना सुट्टी देण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. 

Web Title: marathi news muncipal karmachari