शहरात आता 1.3 किलोमीटरला एक सफाई कर्मचारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

नाशिक : महापालिकेत सफाई कर्मचायांची कमतरता असली तरी नियोजन नसल्याने संपुर्ण व्यवस्थाचं कोलमडली होती परंतू आता सफाई व्यतिरिक्त टेबलांवर ठाण मांडून बसलेल्या सफाई कर्मचायांच्या हातात देखील झाडू देण्यात आल्याने उपलब्ध झालेले व नियमित काम करणाऱ्या 1474 सफाई कर्मचाऱ्यांची नियमाप्रमाणे 1.3 किलोमीटरला एक या प्रमाणे समानीकरण करून वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे आता सिडको व सातपूर विभागावर अन्याय होत असलेल्याची ओरड थांबणार आहे. 

शहराच्या लोकसंख्येचा विचार करता 3700 सफाई कर्मचायांची आवशक्‍यता आहे. परंतू शहरात प्रत्यक्षात 1474 सफाई कर्मचारी आहेत. त्यातील 389 सफाई कर्मचारी झाडू मारण्याचे काम सोडून कारकुनी करतं होते. सफाई कर्मचारी भरती करण्याची मागणी अनेकदा नगरसेवकांकडून झाली. शासनाकडे देखील भरतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रथम सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नावर काम करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम नाशिकरोड, पुर्व व पश्‍चिम विभागातील अतिरिक्त कर्मचारी अन्य विभागाकडे वळविताना कारकूनी करणाऱ्या 389 सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात झाडू दिला. समानीकरणाचे धोरण अवलंबिताना शहरातील रस्त्यांच्या लांबीनुसार नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यानुसार शहरातील 1901 किलोमीटर रस्त्यांची लांबी गृहीत धरून 1.3 किलोमीटर रस्ता लांबीसाठी एक सफाई कर्मचारी देण्यात आला आहे. यापुर्वी सिडको विभागात झाडू काम करणाऱ्या सफाई कर्मचायांची संख्या फक्त नव्वद होती.  नव्या नियोजनानुसार सिडको व सातपूर विभागाला अधिक कर्मचारी मिळाले आहे. 

नवे नियोजन असे 
विभागाचे नाव रस्त्याची लांबी (किलोमीटर) सफाई कर्मचारी संख्या 
सिडको 483.66 373 
नाशिक पुर्व 266.50 205 
नशिकरोड 259.78 201 
पंचवटी 406.66 312 
पश्‍चिम 168.81 129 
सातपूर 315.59 254 
एकुण 1901 1474 
 
Web Title: marathi news muncipal safai worker