खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप, आरोपीच्या पत्नीची साक्ष ठरली महत्त्वाची 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

नाशिक : नांदगाव कोहली पैकी खुटपाडा (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे दिवाळीच्या वेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

5 डिसेंबर 2015 रोजी रात्री घडलेल्या घटनेत आरोपी दशरथ किसन जाधव, रामदास पांडुरंग आहेर यांनी सुभाष काळू गावित (28) याचा गळा आवळून खून केला होता. याप्रकरणी आरोपी रामदास आहेर याची पत्नी लक्ष्मीची साक्ष जशी महत्त्वाची ठरली तशीच, मोबाईलची तांत्रिक माहितीचा सबळ पुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायधीश एन. जी. गिमेकर यांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. 

याप्रकरणी हरसुल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल होता. मृत सुभाष काळू गावित याचे आरोपी रामदास आहेर व दशरथ जाधव यांच्याशी भांडण झाले होते. त्या भांडणाची कुरापत काढून दोघ आरोपींनी सुभाष गावित यास घटनेच्या दिवशी रात्री  साडेआठला गावाबाहेरील भात शेतात बोलाविले. त्यासाठी दोघांनी त्याचा दोराच्या सहाय्याने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर ते पसार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी हरसुल पोलीसात खूनाचा गुन्हा दाखल होऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.पी. सांळुंखे यांनी तपास करून दोघा आरोपींना अटक केली होती.

याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश एन. जी. गिमेकर यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. रवींद्र निकम यांनी कामकाज पाहताना, 10 साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपी रामदास आहेर याची पत्नी लक्ष्मी आहेर हिची साक्ष व मोबाईलची तांत्रिकी माहितीचे सबळ पुरावे न्यायालयासमोर आले.

Web Title: marathi news murder wife witness