मुथुटच्या दरोड्याप्रकरणी गुजरातमधून एकजण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

नाशिक : येथील उंटवाडी रोडवरील मुथूट फायनान्स दरोडयाप्रकरणी सहा दिवसानंतर गुजरातमधून ताब्यात घेण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. सशस्त्र दरोड्याच्या घटनेतील संशयित हे उत्तरप्रदेश-बिहारमधील असण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.यामागे नाशिकमधील सराईत गुन्हेगारांचे त्यांना पाठबळ मिळाल्याचीही चर्चा आहे. 
 
गेल्या शुक्रवारी अज्ञात चौघांनी सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयितांनी केलेल्या गोळीबारात कर्मचारी एम. सॅजू सॅम्युअल यांचा मृत्यु झाला. या घटनेमुळे नाशिक शहर हादरले होते. पोलिसांची सुमारे 12 ते 15 पथके राज्यास गुजरात, मध्यप्रदेशात रवाना करण्यात आली होती. युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने गुजरातमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, संशयित हे उत्तरप्रदेश-बिहारमधील असल्याचे समोर येते आहे. तर संशयितांनी मुथूट फायनान्सवर दरोडा टाकण्यापूर्वी रेकी केली होती. त्यानंतर त्यांनी दरोड्याचा प्रयत्न केला. यादरम्यान संशयित हे सिडको वास्तव्याला असल्याचेही समोर येते आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news muthoot daccati