नदीजोड सिन्नरचे प्रकल्प वगळण्याच्या मुद्यावर शिवसेना आक्रमक 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

नाशिक-  पश्‍चिम वाहिणी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या मुद्यावर तीन शिवसेना पाठपुरावा करीत असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील प्रकल्पांना राज्य मंत्रीमंडळाने वगळण्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार गोडसे यांनी याविषयावरुन आज जलसंपदा सचिवांची भेट घेउन "दुष्काळी सिन्नरवर अन्याय करु नका असा तंबी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या हा विषय निदर्शनास आणून देणार असून त्यानंतर दुष्काळी सिन्नरवर अन्याय होणार असल्यास, शिवसेना स्टाईलने ÷उत्तर देण्याचा इशारा दिला. 

नाशिक-  पश्‍चिम वाहिणी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याच्या मुद्यावर तीन शिवसेना पाठपुरावा करीत असलेल्या सिन्नर तालुक्‍यातील प्रकल्पांना राज्य मंत्रीमंडळाने वगळण्याच्या मुद्यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे. खासदार गोडसे यांनी याविषयावरुन आज जलसंपदा सचिवांची भेट घेउन "दुष्काळी सिन्नरवर अन्याय करु नका असा तंबी दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या हा विषय निदर्शनास आणून देणार असून त्यानंतर दुष्काळी सिन्नरवर अन्याय होणार असल्यास, शिवसेना स्टाईलने ÷उत्तर देण्याचा इशारा दिला. 

पश्‍चिम वाहिणी नद्यांतून दुष्काळी सिन्नर तालुक्‍यातील गारगाई-अप्पर वेतरणा-कडवा देवनदी आणि दमणगंगा-एकदरे या दोन नदीजोड प्रकल्पांसाठी 4 वर्षापासून जलचिंतन संस्थचे राजेंद्र जाधव खासदार हेमंत गोडसे यांचा पाठपुरावा सुरु आहे. मात्र राज्य मंत्रीमंडळाने मंगळवारी (ता.30) बैठकीत, नदी जोड प्रकल्पातून मराठवाड्यासाठी पाणी 
देतांना सिन्नरचे प्रकल्पच वगळत सत्ताधारी शिवसेनेला धक्का दिला. ज्या सिन्नरच्या दुष्काळ निवारणासाठी या प्रकल्पांचा शक्‍यता गृहीत धरुन कामकाज झाले. कल्पना पुढे आली ती नदीजोडची कल्पना बासनात गुंडाळून भाजपने शिवसेनेच्या प्रकल्पाला धक्का देण्याचा हा प्रकार सकाळ ने आज शुक्रवारी (ता.2) उघडकीस आणल्यानंतर आज शिवसेनेच्या पातळीवर त्याचे पडसाद उमटले. 

जलसंपदा'ला इशारा 
खासदार हेमंत गोडसे यांनी जलसंपदा सचिवांना भेटून असा "खो' घालू नका अशी तंबी दिली. सिन्नरला हा 1972 पासूनचा दुष्काळी तालुका आहे. दुष्काळ निवारणासाठी हा प्रकल्पासाठी 4 वर्षापासून पाठपुरावा सुरु आहे. अडीच वर्षाची कामे अवघ्या 7 महिण्यात पूर्व शक्‍यता अहवाल पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. 75 टक्के कामकाज पूर्ण होत आले असतांना आमची कल्पना पळविण्यासारखा हा प्रकार म्हणजे दुष्काळी सिन्नरच्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे सिन्नरच्या प्रकल्पांना वगळले जाउ नये. अशा शब्दात तंबी दिली. 

मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणू 
सकाळशी बोलतांना खासदार गोडसे म्हणाले की हा विषय चार वर्षापासून सुरु आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध असण्याचे कारण नाही.पण सिन्नर तालुकाही दुष्काळी आहे. तेथील दुष्काळ निवारणासाठी दोन्ही प्रकल्पांसाठी पाठपुरावा करीत असल्याने याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून जलसंपदा विभागाचा हा प्रकार लक्षात आणून देणार आहे. मात्र त्यानंतरही सिन्नरचे प्रकल्प वगळले जाणार असतील तर मात्र नागरिकांच्या मदतीने शिवसेना स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला. 

मराठवाड्याला पाणी द्या, पण आम्ही सुचविलेल्या अल्पावधीत अहवाल केलेल्या प्रकल्पांनाच खो घालून आमच्या परिश्रमातून तयार होणारे जेवणाचे ताट इतरांना वाढून देणार असाल तर मात्र त्याला शिवसेना स्टाईलने तीव्र विरोध केला जाईल. पूर्व शक्‍यता अहवाल हा मूळात सिन्नरच्या दुष्काळ निवारणाचा हेतू डोळ्यासमोर ठेउन केला आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी इतर कुणाचे पाणी न घेता वाया जाणारे पाणी आडविण्याचा प्रयत्न आहे. मराठवाड्याला पाणी देण्यास विरोधाचे कारण नाही पश्‍चिम वाहिणी नद्याचे 
पाणी खुशाल द्यावे आम्ही त्यात, जे त्यांना अजून माहीती नाही अशी माहीती पुरवू. पण आम्ही तयार केलेले जेवणाचे ताट कुणाला पळवू देणार नाही. 
- हेमंत गोडसे (खासदार नाशिक) 

सिन्नर दुष्काळी तालुका आहे. वर्षानुवर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तालुक्‍यातील दुष्काळ निवारणासाठी तीन वर्षापासून खासदार हेमंत गोडसे व राजेंद्र जाधव व त्यांचे सहकारी प्रयत्नशील आहे. त्यामुळे शिवसेना पाठपुरावा करीत असलेल्या विषयाला बगल देउन नागरिकांना तहानलेले ठेवण्याचा प्रयत्न होणार असेल तर रस्त्यावर 
उतरून उत्तर दिले जाईल. 
- राजाभाउ वाजे (आमदार सिन्नर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nadhi jod project