नवापूर तालुक्‍यात अतिवृष्टीने पूल वाहिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

नंदुरबार ः जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात आज पहाटे तीनच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने उंची शेवडी येथील बांध फुटला. यामुळे पाण्याचा लोंढा आल्याने बोकळझार जवळील पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. 

नंदुरबार ः जिल्ह्यातील नवापूर तालुक्‍यात आज पहाटे तीनच्या सुमारास अतिवृष्टी झाल्याने उंची शेवडी येथील बांध फुटला. यामुळे पाण्याचा लोंढा आल्याने बोकळझार जवळील पूल वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला. 
अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून खानदेशात जोरदार हजेरी लावली आहे. गुरूवारी (ता.16) दिवसभर पाऊस झाल्यानंतर रात्री देखील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. यात नवापूर तालुक्‍यात आज पहाटे तीनच्या सुमारास अतिवृष्टी झाली. यामुळे उंची शेवडी येथील पाणी अडविण्यासाठी तयार केलेला बांध फुटला. पाण्याचा अचानक लोंढा आल्याने बोकळझार जवळील वाहतुकीचा पुल वाहून गेला. पहाटे साडेतीनच्या सुमारास सदर प्रकार घडल्याने पुलावरून फारशी वाहतुक नसल्याने काही दुर्घटना घडली नाही. शिवाय नागपूर- सुरत महामार्गावरील वाहतूक नंदुरबारमार्गे वळविण्यात आली आहे. तर अतिवृष्टीमुळे तालुक्‍यात अनेक झोपड्या व गुरे वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 

Web Title: marathi news nadurbar navapur atirushtri