नव्या मार्गावर प्रतितास 120 किमी वेगाने रेल्वे धावणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नंदुरबार : उधना ते जळगाव रेल्वे दुहेरीकरण मार्गातील दोंडाईचा ते नंदुरबार रेल्वे स्टेशनमधील रेल्वे रुळांची पश्‍चिम रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांकडून पाहणीस आज प्रारंभ करण्यात आला. उद्या(ता. 14) दुपारी 12 ते 2 दरम्यान प्रतितास 120 किलोमीटर या वेगाने रेल्वे नव्या मार्गावर धावणार आहे. या वेगवान गाडीच्या माध्यमातून सर्व बाबींची चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीच्या यशस्वीतेच्या अहवालानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. 

उधना - जळगाव रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी आवश्‍यक असलेले रूळ मिळण्यास उशीर होत असल्याने कामात काहीसा खोळंबा झाला. या मार्गावरील दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यानच्या कामाचे अंतीम निरीक्षण होत आहे. रेल्वेचे मंडळ प्रबंधक मुकुल जैन यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नंदुरबार - दोंडाईचा या 30 किलोमीटरच्या दुहेरीकरण कामाची पाहणी केली. 306 किलोमीटरच्या अंतरापैकी 276 किलोमीटरचे दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. 

उधना - जळगाव दरम्यानच्या उधना ते चलथान दरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उधना ते चलथानपर्यत नव्या मार्गावर 120 प्रतितास वेगात विशेष गाडी चालवून चाचणी धाव पूर्ण केली. रेल्वेच्या सर्व माणकांना या मार्गाने पूर्ण केले आहे. या मार्गावर गाड्यांचा प्रवास करण्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तशाच पद्धतीने नंदुरबार - दोंडाईचा या 30 किलोमीटरची पाहणी करण्यासाठी प्रतितास 120 किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. 

ंबई रेल्वेचे मंडळ प्रबंधक मुकुल जैन यांनी गेल्या महिन्यात या कामाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत सलग्न विभागांचे अधिकारी होते. त्यांनी ट्रालीने जात विभागाच्या कामाची पाहणी केली होती. या मार्गाचे तांत्रिक काम पूर्ण झाल्याने सीआरएस ला परीक्षणासाठी बोलावण्यात आले आहे. आज आणि उद्या होणाऱ्या पाहणीनंतर मार्गाच्या सुरक्षिततेचे प्रमाणपत्र दिल्यानंतर उधना जळगाव ताप्ती लाइन दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल. 

तपासणीत काय 

प्रतितास 120 किलोमीटर वेगाने रेल्वे धाव चाचणी 
विजेच्या वायरच्या सक्षमतेची पाहणी 
रेल्वे रुळांच्या सक्षमतेसाठी माणकांनुसार तपासणी 
तांत्रिक बाबींचे अंतीम निरीक्षण 
 
Web Title: marathi news nadurbar realway new line