अर्ज भरतेवेळी नगरसेवकांची उडाली तारांबळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

नाशिक- विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. भाजपकडून राहुल ढिकले यांचा अर्ज दाखल करताना मात्र नगरसेवकांची चांगलीचं तारांबळ उडाली त्यात महापौर रंजना भानसी यांचा देखील समावेश होता. त्याला कारण म्हणजे ज्यावेळी ढिकले अर्ज दाखल करणार त्याचवेळी आमदार बाळासाहेब सानप देखील अर्ज दाखल करणार असल्याने नेमक्‍या कुठल्या गटात जायचे, एकीकडे पक्षाची तर दुसरीकडे आमदार सानप यांची नाराजी ओढावण्याची भिती नगरसेवकांच्या चेहऱ्यावर दिसतं होती. 

आमदार सानप यांचे भाजपवर आतापर्यंत निर्विवाद वर्चस्व होते. परंतू पुर्व विधानसभा मतदारसंघातून ऍड. राहुल ढिकले यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सानप यांच्या गडाला मोठा सुरूंग लागला. त्यामुळे सानप समर्थक व भाजप असे दोन गट पडले. दोन दिवसांपुर्वी सानप यांच्या निवासस्थानासमोर समर्थक नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करतं नगरसेवक पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भाजप मध्ये मोठ्या भुकंपाची शक्‍यता वर्तविली जात होती. आज ऍड. ढिकले यांचा अर्ज दाखल करताना सानप यांचे जोरदार समर्थन करणारे नगरसेवक मात्र झाडून हजर होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nager sevak