नागपूरला कंपनीतून चोरलेल्या  27 टन लोखंडी सळ्या नाशिकला जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून चोरलेल्या 27 टन लोखंडी सळ्या नाशिकमध्ये जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी केली.

नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून चोरलेल्या 27 टन लोखंडी सळ्या नाशिकमध्ये जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी केली.

शहरातील पाथर्डी परिसरातील ज्ञानेश्‍वर नगरला बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या असून, एका जणाकडून या सळ्या विकण्यासाठी ग्राहकाचा शोध घेतला जात असल्याची गुप्त माहिती युनिट दोनचे उपनिरीक्षक रवींद्र सहारे यांना मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचत सळ्या विकणाऱ्या अजिज मुख्तार मलिक (42, रा. गरीब नवाजनगर, धुळे) या संशयितास ताब्यात घेत चौकशी केली. त्याने नागपूरच्या बुटीबोरीतील एका कंपनीतून सळ्या चोरल्याचे सांगितले. याप्रकरणी बुटीबोरी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हाही दाखल होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मलिक याच्याकडून 27 टन टाटा टिस्कॉन कंपनीच्या 10 एमएम साईजच्या 15 लाख 57 हजारांच्या लोखंडी सळ्या जप्त केल्या. 

Web Title: marathi news nagpur company stolen steel