दहा लाख खर्चून नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण 

residentional photo
residentional photo

नाशिक, ः गरजू आणि गरीब रुग्णांवरील दर्जेदार उपचारांसाठी उत्तर महाराष्ट्रातील नामको रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी 10 कोटींची कर्ज उभारणी केली जाणार आहे. पेठ रोडवरील संस्थेच्या रुग्णालयातील सभागृहात ट्रस्टचे अध्यक्ष सोहनलाल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. संस्थेचे सचिव शशिकांत पारख यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत संस्थेच्या घटनादुरुस्तीलाही मंजुरी देण्यात आली. तसेच रिक्त झालेल्या पदावर राहुल कांतिलाल दोडिया यांची नियुक्ती करण्यात आली. 

श्री. भंडारी म्हणाले, की नामको चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रुग्णालयातील खाटांची संख्या रुग्णांच्या तुलनेत कमी पडत असल्याने खाटांच्या क्षमतेत वाढ करताना शस्त्रक्रिया विभागा (ऑपरेशन थिएटर)चे आधुनिकीकरण केले जाणार आहे. रोगनिदान व शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक विविध स्कोपीज, अत्याधुनिक ब्रेकी मशिनचीही खरेदी केली जाणार आहे. विजेच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. 

गेल्या पाच वर्षांत रुग्णालयाचे नाव येथील उत्कृष्ट उपचार व दर्जेदार सुविधांमुळे सर्वदूर पोचले आहे. नाशिकच नव्हे तर मालेगाव, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर येथूनही रुग्ण उपचारांसाठी येतात. ही सेवा अधिकाधिक रुग्णांपर्यंत पोचावी, हाच ट्रस्टचा मानस आहे. त्यादृष्टीने पावले उचलली जात आहेत. 

 -शशिकांत पारख, सचिव, नामको ट्रस्ट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com