आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ३५ देशांतून ४७१ नामांकने 

धनराज माळी
Monday, 7 December 2020

लॉकडाउनमध्ये सुरू झालेले हे काम अंतिम टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून नंदुरबारचे नाव जगभरातील निर्माते, दिग्दर्शकांपर्यंत पोचले आहे.

नंदुरबार : खानदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय ऑनलाइन चित्रपट महोत्सव होत असून, त्यात ३५ देशांतील ४७१ चित्रपटांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातून चित्रपट निवडप्रक्रिया सुरू झाली आहे. २० डिसेंबरला त्याचा निकाल जाहीर करून विजेत्या चित्रपट, दिग्दर्शक, अभिनेता व अन्य कलावंतांना ॲवॉर्ड देऊन गौरविण्यात येणार आहे. 

महोत्सवात विविध देशांतील दहा परीक्षक चित्रपटांचे परीक्षण करीत आहेत. स्प्राउटिंग सीड इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून हा महोत्सव होत आहे. महोत्सवाची ऑगस्टपासून तयारी सुरू होती. लॉकडाउनमध्ये सुरू झालेले हे काम अंतिम टप्प्यात आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून नंदुरबारचे नाव जगभरातील निर्माते, दिग्दर्शकांपर्यंत पोचले आहे. महोत्सवासाठी हॉलिवूड, अमेरिका, जर्मनी, इराण, कोरिया, बांगलादेश आणि भारतातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते परीक्षक म्हणून लाभले आहेत. हे सर्व दहा परीक्षक महोत्सवाचे परीक्षण करीत आहेत. 

वाचा- वन्यप्राण्यांपासून बचावासाठी तळोद्यातील तरुणाने तयार केली 'फार्म गन'
 

परीक्षण समिती 
चित्रपट महोत्सवासाठी परीक्षण करणारे ज्युरी बोर्ड, डॉ. आलोक सोनी, लेखक, दिग्दर्शक, (मुख्य परीक्षक, भारत), यंग मान कांग, लेखक, दिग्दर्शक (हॉलिवूड, अमेरिका), थॉमस गॉर्श्, लेखक, दिग्दर्शक (जर्मनी), अली घियास्वांद, दिग्दर्शक (इराण), मोंजूरूल इस्लाम मेघ, पत्रकार, लेखक, दिग्दर्शक, (बांगलादेश), युसूफ काझमी, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक (बॉलिवूड, भारत), श्याम रंजनकर, संकलक, लेखक दिग्दर्शक, (बॉलिवूड, भारत) नब्जोफजल खान, ॲक्शन डिरेक्टर (बॉलिवूड, भारत) सुभाष पाटील, लेखक, दिग्दर्शक (भारत), शुभम अपूर्वा, अभिनेता, दिग्दर्शक (भारत) 

पुरस्काराचे स्वरूप 
उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट डॉक्युमेंटरी, उत्कृष्ट ॲनिमेशन्स ,उत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ, उत्कृष्ट निर्माता, उत्कृष्ट कलाकार, बाल कलाकार, संगीत, पोस्टर डिझाईन, सिनेमेटोग्राफी, ऑडिटिंग, स्क्रीन प्ले, कोविड १९ फिल्म, मोबाईल फिल्म या प्रकारे प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. यासाठी फिल्म फेस्टीवल समितीचे संचालक डॉ. सुजीत पाटील, महोत्सवप्रमुख डॉ. प्रकाश ठाकरे, डॉ. सी. डी. महाजन, सल्लागार डॉ. रोशन भंडारी, डॉ. राजेश कोळी, पत्रकार रणजितसिंग राजपूत, समन्वयक म्हणून डॉ. खुशालसिंग राजपूत, आरीफ बट आदी काम पाहात आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nanadurbar four hundred and seventeen nominations from thirty-five countries at the international film festival