नांदगावमध्ये 1 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्रम

Nandgao
Nandgao

नांदगाव : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, नाशिक या संस्थेच्या शतक महोत्सवानिमित राबविण्यात आलेला ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्रमांतर्गत नांदगाव संकुलातील व्ही. जे. हायस्कूल, नांदगाव, मि. भि. छाजेड विद्यामंदिर, नांदगाव माध्यमिक विद्यालय सावरगाव, किसान माध्यमिक विद्यालय वाखारी, सरस्वती विद्यामंदिर मनमाड या शाळांमधील 2,575 विद्यार्थ्यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान कॉलेजच्या मैदानावर सामुहिक सूर्यनमस्कार घालून एक नवीन जागतिक कीर्तिमान स्थापित केला. 

संस्थेतील विद्यार्थ्यांकडून सामूहिकरीत्या 1 कोटी सूर्यनमस्कार घालण्याच्या उपक्रमाची मागील वर्षी रथसप्तमीला सुरवात करण्यात आली. 24 जानेवारी 2018 रथसप्तमीच्या दिवशी या उपक्रमाचा संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

या संकल्पपूर्ती सोहळ्यास साईबाबा हॉस्पिटल, नाशिकचे नामवंत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी स्वतः व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव पाटील, नाशिक यांनी स्वतः विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिक केले. त्यांनी आपल्या मनोगतात, आजच्या यांत्रिक युगात आजची पिढी व्यायामापासून दूर जात आहे. सरासरी आयुर्मान घटत चालले आहे. पुरातन काळापासून भारतीय संस्कृतीत योगाला अनन्य साधारण महत्त्व आहे असे सांगून त्यांनी अष्टांग योगाचे महत्व सांगितले. आजच्या पिढीने वाईट सवयी व व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला व योग्य आहारपद्धती विषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांना आरोग्याचा मंत्र दिला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नांदगाव संकुलाचे प्रमुख शशिकांत आंबेकर होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे व संस्थेचे या विश्वविक्रमी उपक्रमासाठी अभिनंदन केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या शतक महोत्सवानिमित राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. ‘सूर्यनमस्कार एक आविष्कार’ या उपक्रमाचे वैशिष्टे व फायदे सांगून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या प्रसंगी 50 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल धर्मेश यादव (शौर्यचक्र विजेते ), नगराध्यक्ष राजेश कवडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, पोलिस निरीक्षक बशीर शेख, संस्थेचे कार्यकारणी सदस्य संजीव धामणे, टी.एम. बोर्ड अध्यक्ष भैयासाहेब चव्हाण, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य आर.डी. पटेल हे उपस्थित होते. वर्ल्ड रेकोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी उमेश गायधनी यांच्या उपस्थितीत वर्ल्ड रेकॉर्ड  झाल्याचे प्रमाणपत्र शाळेच्या मुख्याध्यापकांना व शाळेच्या प्रमुखांना देण्यात आले.
 
संकल्पपूर्ती सोहळ्याचे शानदार उद्घाटन सर्व प्रमुख अतिथी व सर्व शाळांतील शालेयामिती अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, पालक, नागरिक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन सूर्यनमस्कार संकुल प्रमुख विजय चव्हाण, सहप्रमुख राहुल चिखले, प्रात्यक्षिक प्रमुख वाल्मिक जाधव, सुनिता देवरे यांनी केले. सूत्रसंचलन वृषाली गढरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार एनसीसी अधिकारी जयंत निकम यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com