नंदीनीला प्रवाहीत करण्यासाठी जुने बंधारे तोडले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नाशिक : शहरातून जाणाऱ्या नंदीनी नदीला प्रवाहात करण्या बरोबरचं साचलेले पाणी मोटारद्वारे खेचून शेतीसाठी वापरले जात असल्याने त्यापार्श्‍वभूमीवर महापालिकेने पाच जुने बंधारे पाडण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत नदी पात्रातील तीन बंधारे पाडण्यात आली असून पावसाळ्यापुर्वी नदीपात्रातील सर्व अडथळे दुर केले जाणार आहे. 

  नंदीनी नदी पात्रात पुर्वी जूने बंधारे बांधण्यात आले होते. थेट पाईपलाईन योजनेमुळे बंधाऱ्यांचा उपयोग नसल्याने अनेक वर्षांपासून ते पडून होते त्यातून अनेक समस्या निर्माण होत होत्या. पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढणे, उग्र दर्प येणे त्याव्यतिरिक्त सर्वात महत्वाचा अडथळा पाण्याला निर्माण होत होता. पावसाळ्यात पुर आल्यास ते पाणी अडून बाजुच्या परिसरात शिरायचे त्यामुळे विनाकारण हानी होत होती त्यामुळे अनेक वर्षांपासून बंधारे हटविण्याची मागणी होत होती. पाटबंधारे विभागाने बंधारे हटविण्याच्या सुचना दिल्या होत्या त्यानुसार महापालिकेने नंदीनी नदी पात्रातील तिरडशेत, अंबड-लिंक रोड, गोविंद नगर येथील दोन त टाकळी रोड येथील जुने बंधारे हटविण्यास सुरुवात केली आहे. 
 
Web Title: marathi news nandini river problem