नंदुरबारच्या 195 गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर 

नंदुरबारच्या 195 गावांत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर 

नंदुरबार : राज्यातील इतर तालुक्‍यातील महसुली मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 750 मिलिमीटर पर्यजन्यमानाने कमी झाले आहे. परिणामी महसुली मंडळातील 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी आलेल्या राज्यातील 931 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर होऊन उपयोजना करण्यात येत आहे. राज्य शासनाने दुष्काळ सदृश परिस्थिती नंदुरबारच्या 195 गावांचा समावेश असून जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी शासकीय योजना राबवण्यासह उपाय योजनेचे आदेश दिले आहे. 

जिल्ह्यात 2018 च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या व अद्यापही दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित न केलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातील चार हजार 518 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित न केलेल्या त्यांच्यापैकी नंदुरबार जिल्ह्यातील 195 गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित करण्यात आली असून त्यामध्ये विविध सवलती लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अक्कलकुवा तालुक्‍यातील महसूल मंडळ डाब, वडफळी, मोलगी यामधील 96 गाव, धडगाव तालुक्‍यातील 99 गावांमध्ये अंतिम पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये दुष्काळ घोषित करून विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. या गावात ग्रामस्थांना जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीची निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्‍यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी सुविधा मिळणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com