शहाद्यात बंदला हिंसक वळण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

शहादा (जि. नंदुरबार) ः अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा संदर्भात फेरविचार करण्यात यावा, या मागणीसाठी आज आदिवासी- दलित ऍट्रॉसिटी संघर्ष समितीच्यावतीने शहादा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळपासून शहाद्यात बंद पाळण्यात आला असता, त्याला हिंसक वळण मिळाले. यामुळे आंदोलनकर्त्यांनी बंद दरम्यान शहादा आगाराच्या चार बसेसवर दगडफेक करत काचा फोडल्या. या दगडफेकीत शहादा आगारातील फोडलेल्या बसमुळे सुमारे 1 लाख 30 हजाराचे नुकसान झाले. शहरात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत असून तहसिल कार्यालयाजवळ धरणे आंदोलन सुरू आहे शहरात तणावपूर्ण शांतता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Web Title: marathi news nandurbar band