दिवाळीनंतर वाजणार बॅन्ड; बुकिंगला ना हरकत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

दिवाळी नंतरच्या हंगामात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांची बुकिंग करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करुन जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांना दिलासा मिळाला. 

नंदुरबार : कोरोनामुळे नियमांचे पालन करीत जीम व मॉलसाठी शासनातर्फे येत्या काळात मान्यता मिळणार आहे. याच धर्तीवर लवकरच बॅन्ड कलावंत आणि वादकांना वाद्य वाजविण्याची मुभा देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी आश्वासन दिले. दिवाळी नंतरच्या हंगामात लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांची बुकिंग करण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट करुन जिल्ह्यातील बँड व्यावसायिकांना दिलासा मिळाला. 

अवश्‍य पहा- थरारक..बिबट्या शिरला चाळीत; साऱ्यांचाच थरकाप, वासरीला घेवून क्षणात पसार 

शासनस्तरावर मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख गायिका दिप्ती शिवदे, जिल्हा प्रमुख सुनिल पवार उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यापासून राज्यात लॉकडाऊनमुळे बॅन्ड व्यावसायिक, कलावंत आणि कुटूंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येत्या काळात नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या लग्नसराई हंगामात यंदातरी बॅन्ड व्यावसायिकांना वाद्य वाजविण्याची परवानगी मिळावी, राज्यशासनातर्फे बॅन्ड कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर दिप्ती शिवदे, महाराष्ट्र बॅन्ड कलावंत संघटना जिल्हा अध्यक्ष सुनिल पवार, नंदुरबार तालुकाध्यक्ष सागर सोनवणे,अक्कलकुवा तालुका प्रमुख विनेश पाडवी, परवेज मकरानी, लक्ष्मण वसावे, प्रकाश वसावे, दिपक सोनवणे, एकनाथ गोरवे, पंडित पवार, रमेश मोरे, किशोर पाडवी, दिनेश पाडवी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar band permission after diwali