भरधाव टँकर अंगण झाडणाऱ्या युवतीच्या अंगावर आला..आणि उधवस्त करत गेला

अंगणात काहीतरी घडल्याचा आवाज घरातील सदस्यांच्या कानी पडला
accident
accidentaccident


प्रकाशा ः येथील बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील (Barhanpur-Ankleshwar Highway) रामनगर वस्तीला लागून घराच्या अंगणाला झाडू मारणाऱ्या युवतीला (Young lady) शहादाकडून येणाऱ्या भरधाव टँकर (Tanker) (एमएच १७, एजी ००२९)ने विरुद्ध दिशेला जात जबर धडक दिल्याने डोक्याला मार लागल्याने युवती जागीच ठार (death) झाली. तर बेकाबू टँकरने आट्यापाट्या खेळत शंभर फुटांवरील शॉपिंग कॉम्प्लेक्सला (Shopping complex) धडक (Beating) देत सुमारे पाच लाखांचे नुकसान केले. मंगळवार सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात (accident) झाला.


(barhanpur ankleshwar highway tanker accident one young lady death)

accident
दुसरा डोस नाही म्हणताच ग्रामस्‍थ संतापले..आणि लसीकरणचं बंद पाडले

महामार्गाला लागून रामनगर वस्तीत रतिलाल चापा भील हे त्यांच्या पत्नी विमलबाई, मुलगा कैलास, मुलगी तोरण व आई असे राहतात. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास त्यांची पत्नी, मुलगा व आई घरात होते. स्वतः रतिलाल भील हे ओट्यावर बसून दात घासत होते. तर मुलगी तोरण ही अंगणात साफसफाई करत होती. त्यावेळी अचानक शहादाकडून येणाऱ्या टँकरने आट्यापाट्या करत भरधाव विरुद्ध दिशेला येऊन साफसफाई करणाऱ्या तोरण (वय २०)ला धडक दिली. कंटेनरचे पुढील चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने ती जागीच ठार झाली. अंगणात काहीतरी घडल्याचा आवाज घरातील सदस्यांच्या कानी पडल्याने बाहेर येऊन पाहताच आईसह कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला.

accident
लस घेण्याला प्रतिसाद..मात्र ऑनलाइन रजिस्ट्रेशनमूळे घोडे अडले !

भरधाव टँकर सुमारे शंभर फुटावरील राजेंद्र लोहार यांच्या मालकीच्या वेल्डिंच्या चार दुकानांना धडकले. धडकेमुळे बाहेर ठेवलेली नवी टपरीही दबली. त्यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे लोहार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. टँकर शिरपूरहून नवापूर येथे जात होते. अपघाताची माहिती वस्तीसह गावात वाऱ्यासारखी पसरली. पंचायत समिती सदस्य जंग्या भील, सरपंच सुदाम ठाकरे, शिवसेनेचे प्रकाशा गटप्रमुख राजेंद्र लोहार, शांतिलाल ठाकरे आदींसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकरचालक विशाल तुकाराम तिरमले (वय २०, रा. विखुरले, ता. शिंदखेडा, जि. धुळे) याला ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. गंभीर जखमी युवतीला ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा येथे नेले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय पावरा यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

(barhanpur ankleshwar highway tanker accident one young lady death)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com